Petrol and diesel prices rise in Himachal Pradesh साम टीव्ही मराठी (AI Image)
बिझनेस

Petrol and Diesel Prices : पेट्रोल-डिझेल अचानक महागले; या राज्य सरकारने लावला 'विशेष सेस', नवी दरवाढ लागू

Himachal Pradesh fuel price hike : हिमाचल प्रदेश सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर अनाथ व विधवा कल्याण सेस लागू केला आहे. पेट्रोलवर ५० पैसे आणि डिझेलवर अतिरिक्त उपकर आकारला जाणार असल्याने इंधनाच्या किमती वाढल्या आहेत.

Namdeo Kumbhar

Himachal Pradesh petrol diesel price hike latest news : महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना सरकारने आणखी एक मोठा झटका दिला आहे. हिमाचल प्रदेश सरकारने राज्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने इंधनावर 'अनाथ आणि विधवा कल्याण सेस' (Orphan and Widow Cess) लागू केल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रति लिटर वाढ झाली आहे.

या नवीन निर्णयानुसार, पेट्रोलवर प्रति लिटर ५० पैसे आणि डिझेलवर प्रति लिटर १ रुपया अतिरिक्त सेस वसूल केला जाणार आहे. सरकारने जमा होणारा हा निधी अनाथ मुले, निराधार महिला आणि विधवांच्या कल्याणासाठी वापरला जाईल असे स्पष्ट केले असले, तरी या अचानक झालेल्या दरवाढीमुळे वाहनधारक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे.

हिमाचल प्रदेश सरकारच्या या निर्णयानंतर राजधानी शिमलामध्ये पेट्रोलचा दर ₹102.45 वरून ₹103.05 प्रति लिटर झाला आहे. तर हाय-स्पीड डिझेलवर प्रति लिटर 60 पैशांचा अतिरिक्त उपकर लावण्यात आला आहे. राज्य कर आणि उत्पादन शुल्क विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, हा उपकर हिमाचल प्रदेश मूल्यवर्धित कर (व्हॅट) अधिनियम, २००५ च्या कलम ६-अ अंतर्गत आकारला जाईल. हा उपकर पेट्रोल आणि हाय-स्पीड डिझेलच्या पहिल्या विक्रीच्या वेळी आकारला जाईल.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात हिमाचल प्रदेश विधानसभेने 'हिमाचल प्रदेश मूल्यवर्धित कर (सुधारणा) विधेयक, २०२६' मंजूर झाले होते. त्यानुसार इंधन उपकर लागू करण्यात आला आहे. या विधेयकाने राज्य सरकारला पेट्रोल आणि हाय-स्पीड डिझेलवर प्रति लिटर ५ रुपयांपर्यंत विधवा आणि अनाथ उपकर लावण्याचे अधिकार दिले आहेत. दरम्यान, या उपकरातून जमा होणारा निधी राज्यातील अनाथ आणि विधवांच्या कल्याणासाठी आणि मदतीसाठी वापरला जाईल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : धोकादायक आंबा घाटातून एसटी वाहतूकही बंद

Tea Affect On Digestion System: चहा प्यायल्याने पचनक्रियेवर काय परिणाम होतो? जाणून घ्या ‘हे’ 5 महत्त्वाचे फायदे- तोटे

Daulatabad Fort : इतिहासातील सर्वात मजबूत किल्ल्यांपैकी एक! दौलताबादच्या अभेद्य संरक्षण रचनेचं रहस्य वाचून थक्क व्हाल

Eggs and cholesterol: अंडं खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का? जाणून घ्या कोणत्या व्यक्तींनी अंडं खावं पूर्णपणे टाळावं?

आंबट-गोड चिंच खाल्ल्यावर शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या फायदे परिणाम

SCROLL FOR NEXT