Maharashtra Petrol Diesel Prices: जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत दररोज बदल होत असतात. गेल्या दोन दिवसांपासून क्रूडच्या किंमतीमध्ये विशेष बदल झालेला नाही. ब्रेंडक्रूड ऑइल सध्या ८० डॉलरवर पोहचले आहे. शुक्रवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी कच्च्या तेलाच्या किंमती जाहीर केल्यात. त्यानुसार आज नोएडामध्ये पेट्रोलचे दर घसरले आहेत. (Latest Petrol Diesel Fresh Prices)
सरकारी तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या दरांनुसार, नोएडामध्ये पेट्रोल ३५ पैशांनी स्वस्त झालं असून ९६.६५ रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे. तसेच डिझेल ३२ पैशांनी स्वस्त झाले असून ८९.८२ रुपये प्रति लिटर आहे. पटनामध्ये आज पेट्रोलचे दर २७ पैशांनी कमी झालेत. त्यानुसार पेट्रोल १०७.३२ रुपये प्रति लिटर आणि डिझेल २५ पैशांनी स्वस्त होऊन ९४.११ रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे.
हरियाणाची राजधानी गुरुग्राममध्ये देखील पेट्रोलचे दर घसरलेत. इथे २२ पैशांनी किंमती घसरल्या असून ९६.८९ रुपये प्रति लिटरने पेट्रोल विकले जात आहे. तर डिझेलच्या दरांमध्ये २१ पैशांची घसरण झाली आहे. डिझेल ८९.७६ रुपये प्रति लिटवर पोहचले आहे.
चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
दिल्लीत (Delhi) पेट्रोल ९६.६५ रुपये आणि डिझेल ८९.८२ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.
मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर आहे.
कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर आहे
चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर.
तुमच्या शहरातील दर कसे तपासाल ?
दररोज जर तुम्हाला पेट्रोल व डिझेलच्या किंमची तपासायच्या असतील तर तेल कंपन्या एसएमएस सुविधा देतात. HPCL ग्राहक HPPRICE <डीलर कोड> 9222201122 वर, इंडियन ऑइल (Oil) RSP <डीलर कोड> 9224992249 वर आणि BPCL ग्राहक <डीलर कोड> 9223112222 वर एसएमएस करू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.