Petrol Diesel Price Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलचे भाव वाढले की कमी झाले?जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price Today 4th September 2024: देशभरात रोज पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर केले जातात. जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे इंधनाचे भाव.

Siddhi Hande

देशभरात रोज सकाळी इंधन कंपन्या पेट्रोल डिझेलचे दर जाहीर होत असतात. पेट्रोल डिझेलचे दर गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर आहेत.पेट्रोल डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून असतात.

सध्या सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे अनेकजण वाहन घेण्याचा विचार करत असतील. जर तुम्ही कार घेत असाल तर पेट्रोल डिझेलचा खर्च हा वाढणार आहे. त्यामुळे तुम्ही आधी पेट्रोल डिझेलचे भाव चेक करा. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव.

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे दर

मुंबईत पेट्रोल १०३.४४ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेल ८९.९७ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे.पुण्यात पेट्रोलचे दर १०४.०८ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.६१ रुपये आहे. ठाण्यात पेट्रोलचे दर १०३.६६ रुपये आहे तर डिझेलचे दर ९०.१८ रुपये आहे. नाशिकमध्ये पेट्रोलची किंमत १०४.४६ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.९८ रुपये आहे. नागपूरमध्ये पेट्रोलची किंमत १०४.२० रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.७५ रुपये आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोलची किंमत १०४.४८ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.०२ रुपये आहे.

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे दर

नवी दिल्लीत पेट्रोलची किंमत ९४.७२ रुपये आहे तर डिझेलची किंमत ८९.९७ रुपये आहे.कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत १०४.९५ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.७६ आहे. चेन्नईत पेट्रोलची किंमत १००.८६ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९२.४४ रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राहुल बोंद्रे काँग्रेसमध्येच; बुलढाणा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

'त्या' विधानाने अमरावतीत राजकीय भुकंप! यशोमती ठाकूर बावनकुळेंवर संतापल्या; पाहा काय घडलं?

राजकारणातील सर्वात मोठा धक्का! भाजपचा दारूण पराभव, सर्वच नगरसेवकांनी केली बंडखोरी, चक्रावून टाकणारा निकाल

Cancer symptoms in women: रात्री उशिरा जेवण टाळा! झोप, पचन आणि वजनावर होऊ शकतो परिणाम

भाजप अन् आम आदमी पक्षाची 'या' ठिकाणी युती; राजकारणातली सर्वात मोठी बातमी

SCROLL FOR NEXT