Petrol Diesel Rate Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Price : डिझेल तब्बल २५ रुपयांनी महागले, पेट्रोलच्या दरातही मोठी वाढ, या कंपनीने अचानक वाढवल्या किंमती

Petrol Diesel Rate : खासगी तेल कंपन्यांनी इंधन दरात मोठी वाढ केली असून शेल इंडियाने डिझेलमध्ये ₹२५ आणि पेट्रोलमध्ये ₹७.४१ प्रति लिटर वाढ केली आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा थेट परिणाम देशातील इंधन दरांवर दिसत आहे.

Namdeo Kumbhar

Petrol Diesel Price Latest Marathi News : सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत आज कोणताही बदल न करता स्थिर ठेवल्या आहेत. सरकारी कंपन्यांनी तेलाचे दर स्थिर ठेवले असताना खासगी कंपन्यांनी मात्र दर वाढवले ​​आहेत. नायरा एनर्जीनंतर शेल इंडियाने इंधनाच्या दरात मोठी वाढ केली आहे. एक एप्रिलपासून नवे दर लागू झाल्याची माहिती समोर आली आहे. डिझेलच्या दरात तब्बल २५ रूपयांची वाढ करण्यात आली आहे. तर पेट्रोलच्या दरातही मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. (Petrol Diesel Rate)

किती वाढल्या किंमती ?

जागतिक मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ होत आहे. इराण-इस्त्राइल युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती १०० डॉलर प्रति बॅरेल इतक्या पुढे गेल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीच्या दरात झालेल्या प्रचंड दरवाढीच्या पार्श्वभूमीवर खासगी कंपन्या आपले नुकसान कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. एक एप्रिलपासून शेल इंडियाने पेट्रोलच्या दरात ₹७.४१ आणि डिझेलच्या दरात ₹२५ नी वाढ केली आहे. त्यामुळे खासगी पंपावर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. पेट्रोलची किंमत प्रति लिटर ₹११९ आणि डिझेलची किंमत ₹१२३ पर्यंत पोहचली आहे.

प्रीमियम पेट्रोलच्या दरात वाढ

प्रीमियम पेट्रोलच्या दरात तेल कंपन्यांनी नुकतीच वाढ केली आहे. १ एप्रिल रोजी इंडियन ऑइलने XP100 च्या दरात प्रति लिटर ११ रुपयांची वाढ केली. यामुळे दर प्रति लिटर १४९ रुपयांवरून १६० रुपयांपर्यंत वाढला. त्याचप्रमाणे प्रीमियम डिझेल व्हेरियंट, एक्स्ट्रा ग्रीनच्या दरातही प्रति लिटर ९१.४९ रुपयांवरून ९२.९९ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. आखाती देशात इराण आणि इस्त्राइल यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जागात इंधनाच्या किंमती मोठ्या प्रमाणात बदलल्या आहेत. जगात इंधन दरवाढीचे संकट ओढावले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या सोनम मस्करचा लक्षवेध, १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदक

Ganesh Visarjan: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जन करताना इंजिनिअरिंगच्या २ विद्यार्थ्यांचा मृत्यू

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत

Hill Station: मडगावपासून फक्त 2 किमी अंतरावर आहे हे हिल स्टेशन; मुंबईकरांचं फेव्हरेट डेस्टिनेशन

konkan Beach : महाराष्ट्रातील मिनी मालदीव! कोकणातील समुद्राच्या सौंदर्याला तोड नाही, एकदा फेरफटका माराच

SCROLL FOR NEXT