Petrol Diesel Price Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर, आज सकाळी दरात वाढ झाली का?

latest fuel rates city wise : आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मुंबई, दिल्ली, पुणे, कोलकाता, चेन्नईसह प्रमुख शहरांतील नवीन पेट्रोल-डिझेल दर जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

Petrol Diesel Price Today : मध्यरात्री घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात २९ रूपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यासह प्रमुख शहरात गॅस सिलिंडरचे दर ९४२ रूपयांवर पोहचले आहेत. रविवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचेही नवे दर जारी झाले आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी सर्वसामान्यांना दिलासा देत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ केली नाही.

आज रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर जुन्या दरातच उपलब्ध आहेत. मे महिन्यात इंधनाच्या दरात चार वेळा वाढ झाली होती. मे महिन्यात तेल विपणन कंपन्यांनी प्रति लिटर सुमारे ७.५ रुपयांनी पेट्रोल आणि डीझेलच्या दरात दरवाढ केली होती. मात्र, जून महिन्यात तेलाच्या दरात एकदाही वाढ झालेली नाही. २५ मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अखेरचा बदल झाला नव्हता.

पेट्रोलचा नवीन दर काय आहे? (आजचा पेट्रोलचा दर)

  • नवी दिल्ली - १०२.१२ रुपये

  • कोलकाता – रु ११३.५१

  • मुंबई - 111.21 रुपये

  • चेन्नई - 107.87 रुपये

  • गुरुग्राम – रु १०२.६२

  • नोएडा – रु १०१.९६

  • बंगळूर – रु ११०.८९

  • भुवनेश्वर – रु १०८.९७

  • चंदीगड – रु १०१.५१

  • हैदराबाद – रु ११५.६९

  • जयपूर – रु. ११२.६६

  • लखनौ - १०१.८९ रुपये

  • पाटणा - रु ११४.२४

वेगवेगळ्या शहरांमध्ये डिझेलचा दर काय आहे? (आजचा डिझेलचा भाव)

नवी दिल्ली - रु ९५.२०

कोलकाता – ९९.८२ रुपये

  • मुंबई - 97.83 रुपये

  • चेन्नई - 99.65 रुपये

  • गुरुग्राम – रु ९५.३०

  • नोएडा – रु ९५.४४

  • बंगळूर – रु ९८.८०

  • भुवनेश्वर – रु. १००.६८

  • चंदीगड – ८९.४७ रुपये

  • हैदराबाद – १०३.८२ रुपये

  • जयपूर – ९७.७८ रुपये

  • लखनौ - रु ९५.३६

  • पाटणा - रु. १००.२०

तेल कंपन्यांना दररोज १००० कोटी रुपयांचा तोटा

आखाती देशात युद्ध सुरू झाल्यापासून ७६ दिवस देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे तेल कंपन्यांना दररोज १,००० कोटी रुपयांचे नुकसान झाले. चार वेळा दरवाढ झाल्यानंतर तेल कंपन्यांचे नुकसान दररोज ५०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती अशीच राहिल्यास, पुढील काळात इंधनाच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.

कच्च्या तेलाची किंमत

अमेरिका-इराण युद्ध सुरू होण्यापूर्वी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल सुमारे ७० डॉलर होती. आता ती प्रति बॅरल १०० डॉलरच्या वर पोहोचली आहे. त्यामुळे देशांतर्गत इंधनाच्या किमतीही वाढण्यात आल्या आहेत.आखाती देशातील तणावाची स्थिती कायम राहिली तर इंधनाच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात ६ रूपयांची वाढ होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर एसटी बसचा अपघात

Green Saree Blouse Design: आषाढी एकादशीला हिरव्या साडीवर ट्राय करा 5 फॅशनेबल ब्लाऊज

Navi Mumbai : नवी मुंबई हादरली! भररस्त्यात तरुणाचा नग्न अवस्थेत आढळला मृतदेह

Crime News: रात्री कुटुंबानं काय केलं? पती-पत्नीसह ३ मुलांचा संशयास्पद मृत्यू; कारण वाचून थरकाप उडेल

Varanasi Movie : डोळ्यात आग अन् चेहऱ्यावर मिश्किल हास्य; 'वाराणसी' चित्रपटातील प्रियांका चोप्राचा नवा लूक समोर | PHOTO

SCROLL FOR NEXT