Pepperfry co-founder Died Saam Tv
बिझनेस

Pepperfry Co-Founder Died: पेपरफ्रायचे संस्थापक अंबरिश मुर्ती यांचं हृदयविकाराने मृत्यू; लवकरच कंपनीचा IPO येणार होता

Pepperfry Co-Founder Ambareesh Murty Dies Of Cardiac Arrest In Leh : पेपरफ्राय कंपनीचे संस्थापक अंबरीश मुर्ती यांचे लेह येथे निधन झाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pepperfry Co-Founder Ambareesh Murty:

पेपरफ्राय ही एक नावाजलेली फर्निचर आणि घरगुती वस्तूंचा ऑनलाईन व्यवसाय करणारी कंपनी आहे. कंपनीचे संस्थापक अंबरीश मुर्ती यांचे लेह येथे निधन झाले. अंबरीश मुर्तींच्या निधनाने कंपनीचे कर्मचारी तसेच व्यावसायिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

पेपरफ्राय ही एक फर्निचर आणि होम डेकोरचा व्यवसाय करणारी कंपनी आहे. २०११ साली अंबरीश मुर्ती आणि आशिष शाह या दोघांनी या कंपनीची स्थापना केली. कंपनीचा व्यवसायदेखील उत्तम प्रकारे सुरु आहे. लवकरच कंपनीचा IPO देखील येणार होता. परंतु अंबरिश मुर्ती यांच्या अचानक निधनाने कंपनीला एक मोठे नुकसान झाले आहे.

२०११ साली पेपरफ्राय ही कंपनी सुरू करण्याआधी अंबरिश पुरी यांनी eBay या कंपनीसाठी भारत, मलेशिया आणि फिलिपिन्स येथे मॅनेजरचे म्हणून काम पाहिले होते. याआधी त्यांनी अनेक मोठ्या कंपन्यामध्ये मॅनेजर म्हणून काम केलं.

बाईक राईड करुन लेहला पोहेचले, अन्...

अंबरिश मुर्ती हे एक बायकर होते. वयाच्या ५१ व्या वर्षीही ते मुंबई ते लेह लडाख अशी बाईक ट्रीप करत होते. बाईक राईड करुन ते लेह येथे गेले होते. त्याच ठिकाणी त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूने ऑनलाईन उद्योगाचं मोठे नुकसान झाले आहे.

अंबरिश मुर्ती यांच्या निधनाची माहिती त्यांचे सह संस्थापक आशिष शाह यांनी ट्विटरवरुन दिली. मला अत्यंत दुःख होत आहे हे सांगायला की, 'माझा मित्र, मार्गदर्शक, भाऊ, साथी अंबरिश मुर्ती आता या जगात नाही. काल रात्री लेह येथे हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. त्यांच्यासाठी प्रार्थना करा आणि त्याच्या घरच्यांना या धक्क्यातून बाहेर पडण्याची शक्ती मिळो', असं ट्विट त्यांनी केले आहे.

पेपरफ्राय कंपनीचं काम

पेपरफ्राय कंपनीबद्दल बोलायचे तर, पेपरफ्राय कंपनीने अगदी कमी कालावधीत ग्राहकांना उत्तमोत्तम सुविधा दिल्या आहेत. कंपनीने कोविड काळात उभारी घेतली आहे. ग्राहकांना घरबसल्या ऑनलाईन फर्निचर किंवा घरगुती वस्तू खरेदी करण्यासाठी हे खूप चांगले प्लॅटफॉर्म आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: कार्तिकी यात्रेत विठ्ठल चरणी साडेतीन कोटींचे दान

लठ्ठपणामुळे मधुमेह होतो का? या दोघांमधील संबंध समजून घ्या...

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

Pitbull And Ieopard Fight: पिटबूल आणि बिबट्यामध्ये थरारक झुंज; दोघे एकमेकांवर पडले भारी, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहिलात का?

SCROLL FOR NEXT