पेटीएमच्या शेअरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. आज पुन्हा पेटीएमच्या शेअरमध्ये लोअर सर्किटसह २० टक्क्यांची घसरण पाहायला मिळालीआहे. लोअर सर्किट म्हणजे बाजारात कुणीही पेटीएमचे शेअर खरेदी करत नाही.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियांने दोन दिवसांपूर्वी पेटीएम पेमेंट्स बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध घातले होते. यानंतर काल शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती. पेटीएमचे शेअर आता ४८७ रुपयांवर आले आहेत. दोन दिवसांत पेटीएमचे शेअर जवळपास २७४ रुपयांनी घसरले आहेत. यामध्ये गुंतवणूकदारांचे जवळपास १७.४० हजार कोटी रुपये बुडाले आहेत.
रिझर्व्ह बँकेच्या निवेदनानुसार, Paytm च्या ऑडिट रिपोर्ट आणि बाहेरील ऑडिट रिपोर्टमध्ये असं आढळून आले की, Paytm ने सातत्याने नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे बँकिंग नियमन कायद्याच्या नियम 35A अंतर्गत, २९ फेब्रुवारीनंतर पेटीएम पेमेंट्स बँकेच्या ग्राहकांमध्ये कोणतेही क्रेडिट-ठेवी, व्यवहार, वॉलेट, फास्ट टॅग वापरता येणार नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
Paytm ला त्यांच्या ग्राहकांना पैसे काढण्यासाठी आणि त्यांची शिल्लक वापरण्यासाठी पूर्ण सुविधा द्याव्या लागतील. पेटीएमचे बचत आणि चालू खाते असलेल्या किंवा फास्टॅग वापरणाऱ्या ग्राहकांसाठीही ही सुविधा उपलब्ध असेल. २९ फेब्रुवारीनंतर, पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडचे ग्राहक सेवा वापरू शकणार नाहीत. आणि आरबीआयने पेटीएमला १५ मार्चपर्यंत नोडल खाते सेटल करण्यास सांगितले आहे. (Latest News)
पेटीएमचे फाऊंडर विजय शेखर शर्मा यांनी म्हटलं की, मी प्रत्येक पेटीएम यूजरला सांगू इच्छितो की तुमचे आवडते ॲप सुरु आहे आणि ते २९ फेब्रुवारीनंतरही काम करत राहील. प्रत्येक आव्हानाला एक उपाय आहे आणि आम्ही पूर्ण पालन करून आमच्या देशाची सेवा करण्यासाठी प्रामाणिकपणे वचनबद्ध आहोत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.