Passport Seva Kendra Saam Tv
बिझनेस

Passport Seva Kendra Portal : पासपोर्ट काढणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आताच जाणून घ्या नवी अपडेट

Passport Seva Kendra Portal Shut Till 2nd September: पासपोर्ट काढायचा विचार करत असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. २ सप्टेंबर २०२४ पर्यंत पासपोर्ट सेवा केंद्र पोर्टल काही तांत्रिक कारणांसाठी बंद राहणार आहे.

Siddhi Hande

जर तुम्ही पासपोर्ट काढण्याचा विचार करत असाल किंवा पासपोर्टची प्रक्रिया सुरु केली असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्हाला पासपोर्ट काढायचा असेल तर तुम्हाला २ सप्टेंबरपर्यंत काढता येणार नाही. पासपोर्ट सेवा केंद्र पोर्टल २ तारखेपर्यंत बंद राहणार आहे.

पासपोर्ट केंद्र पोर्टल राहणार बंद

२ सप्टेंबरपर्यंत संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पासपोर्ट सेवा केंद्र पोर्टल बंद राहणार आहे.परराष्ट्र व्यव्हार मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. २ सप्टेंबरपर्यंत कोणत्याही प्रकारची नवीन भेटीची वेळ मिळणार नाही. तसेच ज्या अपॉइंटमेंट या कालावधीत असेल त्या रिशेड्यूल करण्यात येणार आहे.

२९ ऑगस्ट म्हणजे आजपासूनच पासपोर्ट सेवा केंद्र पोर्टल बंद राहणार आहे. या कालावधीत पासपोर्टसंबंधित कोणतेही काम होणार नाही. ज्या लोकांची अपॉइंटमेंट या कालावधीत असेल त्यांची वेळ रिशेड्युल करण्यात येईल.

मार्च महिन्यातदेखील हे पोर्टल तीन दिवसांसाठी बंद होते. काही तांत्रिक कारणांसाठी हे पोर्टल बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे जर तुम्हीही सध्या पासपोर्ट बनवण्याचा विचार करत असाल तर २ सप्टेंबरनंतरच प्रक्रिया सुरु करा.

पासपोर्ट बनवण्याची प्रोसेस

कोणत्याही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय फ्लाइटसाठी पासपोर्टची गरज असते. पासपोर्टसाठी एक प्रोसेस असते. सर्वप्रथम तुम्हाला अर्ज करावा लागतो. तुमचा अर्ज स्विकारल्यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावले जाते. तेथे तुम्हाला तुमच्याविषयी सर्व माहिती विचारली जाते. त्यानंतरच तुमची पासपोर्ट बनवण्याची प्रोसेस सुरु होते. त्यासाठी तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन पासपोर्ट केंद्रावर अपॉइंटमेंट घ्यावी लागते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांना दिलासा

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT