Money Saving Tips meta ai
बिझनेस

Money Saving Tips : मित्र असो वा नातेवाईक, पैशांच्या बाबतीत या ७ चुका कधीच करू नका

Financial Planning : मित्र आणि कुटुंबीयांसोबत पैशांवरून होणारे वाद टाळायचे असतील तर आर्थिक मर्यादा वेळीच ठरवणं योग्य ठरेल.

Sakshi Sunil Jadhav

आयुष्यात मौज करायची असेल तर पैसा खूप महत्त्वाचा भाग आहे. आपण लहानपणापासून पैसे कसे वाचवायचे, हे शिकलो की आपल्याला ऐनवेळी कोणाकडे हात पसरायची वेळ येत नाही. पण बऱ्याचदा पैशांमुळे जवळच्या माणसांमध्येही गैरसमज होतात. मित्रांसोबत बाहेर जाणं, वाढदिवसाला महागड्या भेटवस्तू देणं किंवा नातेवाईकांना पैसे उधार देणं अशा गोष्टींमुळे बजेट बिघडू शकतं. त्यामुळे नातेसंबंध टिकवतानाच स्वत:च्या पैशांचं नियोजन करणंही महत्त्वाचं आहे. यासाठी काही सोप्या सवयी उपयोगी ठरतील.

महागडे प्लॅन निवडण्याची सवय योग्य की अयोग्य?

जर मित्रांना भेटायचं असेल तर दरवेळी महागड्या हॉटेलमध्ये जायची गरज नाही. घरी एकत्र जेवण बनवणं, गार्डनमध्ये फिरायला जाणं किंवा कमी खर्चात मनोरंजन करणं असे ऑप्शन निवडा. त्यामुळे खर्च कमी होईल आणि एकत्र वेळही घालवता येईल.

गिफ्टचे बजेट आधीच ठरवा

तुम्ही कोणाच्याही वाढदिवसाचं, लग्नाचं आणि सणांसाठी गिफ्ट घेत असाल तर तुमचा खर्च जास्त होईल. मग तुम्ही तुमच्या सॅलरीनुसार गिफ्टसाठी ठरावीक रक्कम बाजूला ठेवा. महागड्या भेटवस्तू देण्यापेक्षा मनापासून दिलेल्या छोट्या भेटीलाही महत्त्व असतं.

आर्थिक उदिष्टे ठरवा

घरासाठी बचत करायची असेल किंवा कर्ज फेडायचं असेल, तर जास्तीचा खर्च टाळणं गरजेचं आहे. बजेटमध्ये बसत नसलेल्या कार्यक्रमाला नम्रपणे नकार द्या. पण याचं कारण कोणालाही स्पष्ट करण्याची गरज नाही.

पैसे उधारीवर देताना लक्ष द्या

मित्र किंवा नातेवाईकांना पैसे देण्याआधी स्वत:च्या गरजा आणि आर्थिक क्षमता तपासा. पत मिळाले नाहीत तरी तुमच्या रोजच्या खर्चावर परिणाम होणार नाही, हा विचार करून रक्कम लक्षात घ्या.

बाहेर फिरण्याचा खर्च

रेस्टॉरंटमध्ये जाण्याआधी बिल कसं वाटून घ्यायचं, हे ठरवा. प्रत्येकाने स्वतःच्या खर्चाचे पैसे द्यायचे की बिल वाटून घ्यायचं, हे ठरवून घ्या.

सामाजिक कार्यक्रमांसाठी स्वतंत्र बजेट ठेवा

मित्रांसोबत फिरणं, पार्टी आणि इतर कार्यक्रमांसाठी दर महिन्याला ठरावीक रक्कम बाजूला काढून ठेवा. ही रक्कम संपल्यावर कमी खर्चाचे ऑप्शन निवडा.

गरज पडल्यास नम्रपणे नाही म्हणा

प्रत्येक कार्यक्रमाला जाणं किंवा प्रत्येकाची आर्थिक मदत करणं शक्य नसतं. त्यामुळे आपल्या बजेटनुसार निर्णय घ्या आणि नकार देताना नम्रपणे कारण सांगा.

पैशांपेक्षा नात्यांना द्या महत्त्व

पैशांची मर्यादा ठरवणं म्हणजे नात्यांपासून लांब जाणं नाही. उलट, स्पष्ट संवाद आणि योग्य नियोजनामुळे पैशांवरून होणारे वाद कमी होऊ शकतात. नाती टिकवण्यासाठी महागड्या भेटवस्तूंपेक्षा वेळ, विश्वास आणि परस्परांचा आदर जास्त महत्त्वाचा असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दिल्ली पोलिसांची आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याच्या हालचाली?

Rahul Gandhi: दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना वेग! राहुल गांधी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, आमदार- खासदारांना दिल्लीत येण्याचे आदेश

High Blood Pressure : ऑक्टोबरच्या कडक उन्हात वाढतो हाय BP चा धोका, 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Bike engine oil: किती किलोमीटर्सनंतर बदलायचं बाईकचं इंजिन ऑईल?

Tube tyres vs tubeless tyres: ट्यूबलेस टायर आणि ट्यूब टायर यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे?

SCROLL FOR NEXT