Outlook Down: जगभरातील Microsoft युजर्सना मोठ्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. Microsoft Outlook आणि Teams यांसारख्या महत्त्वाच्या ई-सेवा अचानक थांबली आहे. यामुळे लाखो युजर्सच्या कामावर परिणाम झाला आहे. ई-मेल पाठवणे, इनबॉक्स ओपन करणे, ऑनलाइन मीटिंग आणि ऑफिसमधील महत्त्वाची कामे करण्यात अडचणी येत आहेत. गुरुवारी (१२ नोव्हेंबर) सुरू झालेल्या या समस्येमुळे जगातील अनेक देशांमधील युजर्स त्रास होत आहे. विशेष म्हणजे, या तांत्रिक बिघाडाचा परिणाम Microsoft 365 मधील इतर सेवांवरही झाला आहे.
Microsoft च्या Outlook या ई-मेल सेवेमध्ये अचानक तांत्रिक बिघाड निर्माण झाला. अनेक युजर्सना त्यांचा ई-मेल इनबॉक्स उघडता येत नव्हता, तर काहींना ई-मेल किंवा करता येत नव्हता. याशिवाय Microsoft Teams, SharePoint, OneDrive आणि Copilot यांसारख्या सेवांमध्येही अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे कार्यालयातील कामकाज, ऑनलाइन मिटिंंग आणि फाइल शेअरिंगवर परिणाम झाला.
सुरुवातीला अमेरिकेत ही समस्या जाणवली होती. मात्र, काही वेळातच जगातील अनेक देशांमधील युजर्सनी सेवांमध्ये अडथळे येत असल्याच्या तक्रारी केल्या. माहितीनुसार, सुमारे ७४ देशांमधून या तक्रारी नोंदवण्यात आल्या.
Microsoft ने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, कंपनीच्या अनेक सर्व्हरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यामुळे काही सर्व्हर अनपेक्षितपणे बंद झाले आहेत. परिणामी उर्वरित सर्व्हरवर कामाचा अतिरिक्त भार वाढला आणि कनेक्टिव्हिटीमध्ये अडथळे निर्माण झाले. त्यामुळे Outlook सारखी ई-सेवा डाऊन झाली आहे. कंपनीने स्पष्ट केले की, यामागे अचानक वाढलेली युजर ट्रॅफिक हे मुख्य कारण नाही. अनेक सर्व्हर उपलब्ध नसल्यामुळे उर्वरित यंत्रणेवर ताण निर्माण झाला. मात्र, या बिघाडामागचे नेमके मूळ कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.