Oppo F23 Price Reduced Saam Tv
बिझनेस

Oppo चा हा जबरदस्त स्मार्टफोन झाला स्वस्त, 64MP कॅमेरा आणि दमदार बॅटरी; जाणून घ्या नवीन किंमत

Oppo F23 Price Reduced: प्रसिद्ध मोबाईल उत्पादक कंपनी ओप्पोने अलीकडेच सांगितलं आहे की, ते पुढील आठवड्यात भारतात Oppo F25 Pro स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.

Satish Kengar

Oppo F23 Price Reduced:

प्रसिद्ध मोबाईल उत्पादक कंपनी ओप्पोने अलीकडेच सांगितलं आहे की, ते पुढील आठवड्यात भारतात Oppo F25 Pro स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. नवीन फोन लॉन्च करण्याआधी कंपनीने गेल्या वर्षी लॉन्च केलेल्या Oppo F23 स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे.

Oppo F23 स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन चिपसेट आणि फुल एचडी + डिस्प्ले आहे. जबरदस्त बॅटरी आणि डिझाइन असलेल्या या फोनची किंमत 2000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Oppo F23 ची नवीन किंमत

Oppo ने गेल्या वर्षी मे महिन्यात 24,999 रुपयांमध्ये Oppo F23 लॉन्च केला होता. आता स्मार्टफोनची किंमत 2,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. त्यानंतर हा फोन 22,999 रुपयांना विकला जात आहे. हा स्मार्टफोन दोन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो – बोल्ड गोल्ड आणि कूल ब्लॅक.  (Latest Marathi News)

Oppo F23 चे स्पेसिफिकेशन

Oppo F23 मध्ये 6.72 इंच फुल एचडी + डिस्प्ले देण्यात आलं आहे. ज्याचे रिझोल्यूशन 1080x2400 पिक्सेल आहे. 120Hz पर्यंतच्या रिफ्रेश रेटसह डिस्प्ले पांडा ग्लास सेफ्टीसह येतो. हा स्मार्टफोन 8GB रॅमसह ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटसह येतो. यात 256GB स्टोरेज ग्राहकांना मिळते, जे microSD कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येते.

कॅमेराबद्दल बोलायचे झाले तर, Oppo F23 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये 64MP प्रायमरी कॅमेरा, 2MP डेप्थ सेन्सर आणि 2MP मॅक्रो शूटर आहे. यात सेल्फीसाठी 32MP फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे. डिव्हाइसला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack: नाईट लाईटमुळे हार्ट अटॅकचा धोका 56%; नव्या अभ्यासातून धक्कादायक बाब समोर

प्रवाशांसाठी खुशखबर! फक्त एका तासात पनवेल टू कर्जत गाठा; रेल्वे कॉरिडॉचं काम अंतिम टप्प्यात

IND vs AUS T20 Series: ODIनंतर आता टी२० चा रंगणार थरार; भारत-ऑस्ट्रेलिया कधी येणार आमनेसामने? जाणून घ्या सामन्यांचे वेळापत्रक

Maharashtra Live News Update : बडनेरा मध्ये 27 वर्षीय उच्चशिक्षित युवतीची संशयास्पद आत्महत्या

Accident News : रस्ता ओलांडताना भरधाव ट्रकने उडविले; येवल्यात वाहतूक व्यवस्थेचा बळी

SCROLL FOR NEXT