OnePlus 13 
बिझनेस

मार्केटमध्ये OnePlus चा जलवा; OnePlus 13 भारतात होणार लॉन्च

OnePlus 13 Launch: स्मार्टफोन प्रेमींना नवीन आणि आकर्षक वैशिष्ट्यांसह एक उत्कृष्ट अनुभव देण्यासाठी OnePlus 13 तयार आहे. हा फोन प्रीमियम सेगमेंटमध्ये नवीन ओळख निर्माण करू शकतो.

Bharat Jadhav

OnePlus 13 ने आपला फ्लॅगशिप फोन OnePlus 13ची लॉन्चिंग होणार असल्याची घोषणा केलीय. हा फोन जानेवारी २०२५मध्ये भारत आणि इतर देशात लॉन्च केला जाणार आहे. कंपनीने ग्राहकांची पसंत लक्षात घेत हा प्रीमियम स्मार्टफोन तयार केलाय. मिडनाइट ओशन, ब्लॅक आणि आर्कटिक डॉनमध्ये या तीन रंगात फोन उपलब्ध असणार आहे. या फोनची स्पर्धा Samsung Galaxy S25 सारख्या प्रीमियम सीरिजशी होण्याची शक्यता आहे.

OnePlus 13 फोनची डिझाइन नवीन असणार आहे. या फोनला फ्लॅट फ्रेम देण्यात आलंय. या फोनला सर्वात जास्त प्रीमियम आणि उठावदार करण्यात आले आहे. आधीच्या व्हर्टिकल कर्व्सला काढून त्याला फ्लॅट करण्यात आले आहे. X2 OLED डिस्प्ले शानदार रंग आणि ब्राइटनेस देण्यात येणार आहे. हा डिस्प्ले एडेप्टिव रिफ्रेश रेट देण्यात आलाय.

यामुळे व्हिडिओ, गेम्स आणि इतर अॅप्स सुरळीत चालवण्याचा अनुभव मिळले. कॅमेरा मॉड्यूलला नवीन डिझाइन देण्यात आले आहे. या फोनमध्ये Hasselbladचा लोगो देण्यात आलाय. कॅमेराची गुणवत्ता सुद्धा देखील चांगली असणार आहे.

OnePlus 13 मध्ये Snapdragon 8 Elite प्रोसेसर देण्यात आले आहे. यामुळे फोन चालवण्यास सुलभ वाटतो. या फोनमध्ये 24GB रॅम आणि 1TB स्टोरेजचा पर्याय दिला जाण्याची शक्यता. यामुळे युझर्सला गेम खेळण्यात कोणताच त्रास होत नाही. तसेच या फोनमध्ये ५० मेगापिक्सेलचा तीन कॅमेरा सेटअप देण्यात आलाय.

पहिला कॅमेरा OIS (ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन) तर दुसरा 3x पेरिस्कोप असेल तर तिसरा अल्ट्रावाइड कॅमेरा असणार असल्यांच सांगितलं जात आहे. या फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी असणार. भारतात OnePlus 13 या फोनची किमत 65,000 असण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT