वनप्लस कंपनी नवीन स्मार्टफोन OnePlus Ace 3V लवकरच लॉन्च करणार आहे. हा नवीन स्मार्टफोन 21 मार्च रोजी लॉन्च केलं जाणार आहे. कंपनीनुसार, Ace 3V हा जगातील पहिला क्कालकॉम स्नॅपड्रॅगन 7प्लस जेन 3 एसओसी चिपसेटने चालणारा स्मार्टफोन असेल. वनप्लसच्या या मोबाईलमध्ये एआय फीचर्स असणार आहेत. (Latest News)
कंपनीने नवीन फोनचा प्रोमो टीझर प्रदर्शित केलाय. या मोबाईलच्या एका बाजुला पॉवर बटन आणि वॉल्यूम रॉकर्स असेल असं टीझरमध्ये दिसले आहे. यासह या मोबाईलमध्ये सेंटर्ड पंच होल कटआउट असलेला डिस्प्ले असेल. वनप्लस एस 3Vमध्ये 16 जीबी LPDDR5x रॅम आणि 512जीबी यूएफएस 4.0 इंटनरल स्टोरेज देण्यात येणार आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
डिझाइनमध्ये हा स्मार्टफोन एस 2V सारखा आहे. दरम्यान या फोनमध्ये 3Vच्या कॅमेऱ्यात छोटी रिंग असू शकते. वनप्लस कंपनीचे अध्यक्ष म्हणाले, Ace 3V स्मार्टफोन एआय फिचर्सला सपोर्ट देईल. OnePlus Ace 3V मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 1.5K डिस्प्ले, 50MP OIS रियर कॅमेरा,100W फास्ट चार्जिंगसह 5,500mAh बॅटरी, असे फिचर्स या Android 14 सह अनेक फिचर्स असणार आहेत.
वनप्लसने आपल्या अपकमिंग स्मार्टफोनसाठी प्री रिझर्वेशन सुरू केले आहे. दरम्यान जे ग्राहक सुरुवातीला फोन घेतील त्यांना एक भेटवस्तू कंपनीकडून दिली जाणार आहे. तुम्हाला फोटोग्राफीची आवड असले तर हा फोन उत्कृष्ट आहे. या स्मार्टफोनमध्ये तीन कॅमेरे देण्यात येणार आहेत. फोटो काढण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये एलईडी प्लॅशसह तीन कॅमेरे देण्यात आले आहेत.
या कॅमेऱ्यात मुख्य कॅमेरा 50 मेगापिक्सेल, 8 मेगापिक्सेल आहे. या कॅमेऱ्याला अल्ट्रावाइड अॅगलसह २ मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आलाय. यासह या फोनमध्ये सेल्फीसाठी 16 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.