NTPC Recruitment Saam Tv
बिझनेस

NTPC Recruitment: एनटीपीसीमध्ये सरकारी नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; आजच करा अर्ज

NTPC Recruitment 2026: सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. एनटीपीसी लिमिटेडमध्ये सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचे आहेत.

Siddhi Hande

NTPC लिमिटेडमध्ये नोकरीची संधी

वेगवेगळ्या पदांसाठी भरती सुरु

स्टायपेंड मिळणार २१५०० रुपये

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एनटीपीसी लिमिटेडमध्ये सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. आयटीआय केलेल्या उमेदवारांसाठी सरकारी कंपनीत काम करण्याची संधी आहे. एनटीपीसी लिमिटेडमध्ये Artisan Trainee आणि Assistant Trainee पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचे आहेत.

NTPC मध्ये नोकरीची संधी

एनटीपीसी लिमिटेडमधील (NTPC Recruitment)नोकरीसाठी एकूण २७ पदे भरली जाणार आहेत. यामध्ये फिटर, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, स्टोअर कीपर पदांसाठी भरती केली जाणार आहे. टेक्निकल फील्डमध्ये काम करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे.

एनटीपीसीमधील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १०वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत संबंधित क्षेत्रात ट्रेडमध्ये आयटीआय केलेले असावे. याचसोबत टायपिंगदेखील यायला हवे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत.

एनटीपीसीमधील नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जायचे आहे. यानंतर Recruitment किंवा Careers सेक्शनवर जायचे आहे. यानंतर सर्व माहिती भरायची आहे. यानंतर फॉर्म सबमिट करायचा आहे.

एनटीपीसी लिमिटेडमधील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४० वर्षे असावी. या नोकरीसाठी आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ट्रेनिंगच्या काळात २१,५०० रुपये स्टायपेंड दिली जाणार आहे. स्टायपेंड पूर्ण झाल्यानंतर तुमची बेसिक सॅलरी २१५०० रुपये होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati rahuri bypolls election results: उपमुख्यमंत्री सुनिता पवार यांना 97 टक्के मते मिळतील - रोहित पवार

Tamil Nadu Election Results: मोठी उलथापालथ! थलापति विजय मुख्यमंत्री होणार? तामिळनाडूत सर्वात मोठा उलटफेर

AC Fire Safety: ACमुळे आग अन् गुदमरून मृत्यू! बंद खोल्यांमधल्या या चुका ठरतील जीवघेण्या, वेळीच व्हा सावध

Vijay Thalapathy: विजय थलपती ते खुशबू सुंदर; २०२६ च्या तामिळनाडू निवडणुकांमध्ये कोणत्या 'पॉवर स्टार'च्या पक्षाची येणार सत्ता?

Election Result Live : केरळमध्ये मुख्यमंत्री पिछाडीवर, काँग्रेस उमेदवार आघाडीवर

SCROLL FOR NEXT