NPCI UPI Vyapar Saksham Scheme saam tv
बिझनेस

Digital Payments : छोट्या दुकानदारांसाठी NPCI ची मोठी भेट! UPI सुरू केल्यास मिळणार ₹750 पर्यंतचा फायदा; QR कोडही बसवता येणार मोफत

NPCI UPI Vyapar Saksham Scheme : NPCI च्या UPI व्यापार सक्षम योजनेतून छोट्या दुकानदारांना QR कोडसाठी ३०० रुपये आणि साउंडबॉक्ससाठी ७५० रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळू शकते.

Sakshi Sunil Jadhav

देशभरातल्या छोट्या दुकानदारांसाठी आनंदाची बातमी आहे. आता दुकानात UPI पेमेंट सुरू करायचं असेल, तर QR कोड आणि साउंडबॉक्ससाठी जास्त पैसे खर्च करण्याची गरज पडणार नाही. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने छोट्या व्यापाऱ्यांना डिजिटल पेमेंटशी जोडण्यासाठी 'UPI व्यापार सक्षम' ही योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे पहिल्यांदाच दुकानात UPI पेमेंट स्वीकारणाऱ्या दुकानदारांना ३०० ते ७५० रुपयांपर्यंतचा आर्थिक लाभ मिळू शकतो.

काय आहे UPI व्यापार सक्षम योजना?

व्यापार सक्षम योजनेअंतर्गत छोट्या दुकानदारांना UPI पेमेंटसाठी आवश्यक असलेला QR कोड आणि साउंडबॉक्स बसवण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे.

QR कोडसाठी ३०० रुपये - दुकानात पहिल्यांदा नवीन मर्चंट QR कोड बसवण्यासाठी ३०० रुपयांपर्यंतचा खर्च NPCI कडून संबंधित बँक किंवा पेमेंट कंपनीला दिला जाईल.

  • साउंडबॉक्ससाठी ७५० रुपये: डिजिटल पेमेंट मिळाल्याची माहिती देणारा साउंडबॉक्स बसवण्यासाठी ७५० रुपयांपर्यंतचा लाभ मिळू शकतो.

  • कोणाला लाभ मिळणार? यापूर्वी दुकानात UPI पेमेंट स्वीकारलेले नाही आणि आता पहिल्यांदा डिजिटल पेमेंट सुरू करणारे छोटे दुकानदार या योजनेसाठी पात्र ठरतील.

योजनेचा लाभ कसा घ्यायचा?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी दुकानदार आपल्या बँकेत जाऊन मर्चंट QR कोड आणि साउंडबॉक्ससाठी अर्ज करू शकतात. तसेच Paytm for Business, PhonePe Business, Google Pay for Business किंवा BharatPe या अॅपच्या माध्यमातूनही अर्ज करता येतो. अर्जानंतर संबंधित कंपनीचा प्रतिनिधी दुकानात येऊन सेटअप करू शकतो.

पैसे मिळण्यासाठी काय आहेत अटी?

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. दुकानदाराने UPI सुरू केल्यानंतर सलग दोन महिने प्रत्येक महिन्यात कमीत कमी २५ व्यवहार केले पाहिजेत. तसेच प्रत्येक महिन्यात किमान ५००० रुपयांचे UPI व्यवहार होणं गरजेचं आहे. या अटी पूर्ण झाल्यानंतर NPCI संबंधित बँक किंवा पेमेंट कंपनीला QR कोडसाठी ३०० रुपये आणि साउंडबॉक्ससाठी 750 रुपयांपर्यंतची रक्कम देते. त्यामुळे छोट्या दुकानदारांना डिजिटल पेमेंट सुरू करण्यासाठी आर्थिक मदत मिळू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मिरजेत बंद अवस्थेतील लोहमार्ग पोलीस क्वार्टरला भीषण आग; क्वार्टरचे मोठे नुकसान, जीवितहानी टळली

Blackheads Removal Tips: नाकावर वारंवार ब्लॅकहेड्स येतात? घरच्या घरी करा हे ५ सोपे उपाय, मिळेल सॉफ्ट ग्लोईंग स्किन

भाजलेल्या वांग्याचं भरीत कसं बनवायचं? सोपी रेसिपी माहितीये का?

National Epilepsy Day 2026: फिट्स येणाऱ्या व्यक्तीला स्पर्श केल्याने आजार पसरतो? एपिलेप्सीबाबतचे हे ४ गैरसमज आजच जाणून घ्या

Thyroid Symptoms : थायरॉईड असल्यास शरीर देते 'हे' ७ संकेत, सुरुवातीलाच ओळखा अन् उपचार सुरू करा

SCROLL FOR NEXT