Aadhaar Card Update  Saam Tv
बिझनेस

Aadhaar Card: आता आधार कार्ड बनवायला लागू शकतात 6 महिने, UIDAIने केले 3 मोठे बदल

UIDAI अर्थातच युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने नवीन आधार कार्ड बनवण्याच्या प्रक्रियेत अनेक मोठे बदल केले आहेत. काय आहेत हे बदल चला जाणून घेऊया.

Sejal Purwar

आधार कार्ड हा सध्या सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. कोणतेही शासकीय काम आधार कार्डशिवाय पुर्ण होत नाही. त्यासाठी अनेकांची आधारकार्ड बनवण्याची धावपळ सुरू असते. अगदी लहान बाळाचा जन्म झाला की लगेचच आधार कार्ड काढले जाते. आधार कार्ड शिवाय तुम्ही लाडकी बहिण योजना असो किंवा प्रधानमंत्री आवास योजना कोणत्याच योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. मात्र आता 'UIDAI'अर्थातच युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने नवीन आधार कार्ड बनवण्याच्या प्रक्रियेत अनेक मोठे बदल केले आहेत. काय आहेत हे बदल चला जाणून घेऊया.

18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना आधार कार्ड काढण्यासाठी साधारणत: 6 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. आधार कार्डसाठी नोंदणी केल्यानंतर 6 महिन्यांनी आधार कार्ड मिळू शकेल. UIDAIमध्ये नोंदणी केल्यानंतर व्यक्तीची राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा म्हणजेच स्थानिक पातळीवर पडताळणी केली जाणार आहे. आता UIDAIने आपल्या नियमांमध्ये बदल करत त्रिस्तरीय पडताळणी प्रणाली सुरू केली आहे.

आता आधार सेवा केंद्रातून नावनोंदणी झाल्यानंतर, केंद्रातून प्रथम व्यक्तीचा डेटा बेंगळुरूमधील UIDAI सेंटरमध्ये पाठवला जाईल त्यानंतर ते पुढील पडताळणीसाठी आपल्या राज्यात पाठवले जाणार आहे आणि राज्यानंतर तिसरी पडताळणी नागरिकाच्या जिल्ह्यात केली जाणार आहे अशा प्रकारे तीन वेळा पडताळणी झाल्यानंतरच आधार कार्डची प्रकिया पुर्ण होणार आहे.

नवीन आधार कार्ड कसे बनवायचे?

नवीन आधार कार्ड काढण्यासाठी तुम्हाला काही सोप्या प्रक्रिया कराव्या लागणार आहेत. यासाठी तुम्हाला जवळच्या आधार नोंदणी केंद्रात जाऊन नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी तुम्ही UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर तुमच्या घराजवळील आधार केंद्र शोधू शकतात.

10 वर्ष जुने आधार कार्ड कसे करायचे अपडेट?

10 वर्षे जुने आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे. हे आधार कार्ड दोन प्रकारे अपडेट केले जाणार आहेत. या आधी दिलेली ऑनलाइन मोफत अपडेटची तारीख तीन वेळा वाढवण्यात आली आहे. मागील महिन्यात पुन्हा मुदतवाढ देण्यात आली होती. ज्यामध्ये 14 जून ते 14 सप्टेंबर ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. जर तुम्ही ऑफलाइन आधार अपडेट करत असाल, तर अशा परिस्थितीत तुमच्या फिंगर प्रिंट, आयरीस स्कॅन आणि फेस ऑथेंटिकेशन करूनच तुमचे आधार कार्ड अपडेट होणार आहे.

का झाले आधार कार्ड प्रक्रियेत बदल?

सुरक्षेशी संबंधित सर्व बाबी लक्षात घेता ही नवीन प्रणाली लागू करण्यात आली आहे. आधार योजनेच्या पहिल्या टप्प्यात अर्थातच वर्ष 2010-11 मध्ये नावनोंदणीनंतर आधार कार्ड काढण्यासाठी खासगी एजन्सीकडे जबाबदारी होती. त्यानंतर अर्जदाराने दिलेल्या तोंडी माहितीच्या आधारेच नावनोंदणी करण्यात आली. यातील काही आधार कार्ड बनावट आढळले आणि या आधार कार्डांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याची अनेक उदाहरणे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT