New Rule From 1 January 2025 Saam tv
बिझनेस

New Rule For New Year: नव्या वर्षात ८ नियम बदलणार, सर्वसामान्यांच्या खिशावर पडणार भार

New Rule From 1 January 2025: एका दिवसानंतर नवीन वर्ष सुरू होणार आहे.नव्या वर्षात अनेक बदल होणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवीन वर्षात अनेक नवीन बदल होणार आहेत. एक जानेवारी २०२५ पासून अनेक आर्थिक बदल होणार आहेत. ज्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ शकतो. या बदलांमध्ये LPG किमतींपासून ते UPI च्या नवीन पेमेंट नियमांचा यात समावेश आहे.

एलपीजी सिलेंडर किंमती वाढणार

जानेवारी २०२५ मध्ये एलपीजीच्या किंमती वाढू शकतात. यात आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्चा तेलाच्या किमती सध्या ७३.५८ डॉलर प्रति बॅलर आहे. मार्केटिंग कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजीची किंमतीत बदल करतात. सध्या देशांतर्गत सिलेंडरची (14.2 किलो) किंमत काही महिन्यांपासून अपरिवर्तित आहे, सध्या दिल्लीमध्ये 803 रुपये अशी एका सिलेंडरची किंमत आहे.

फिक्स डिपॉझिटच्या नियमात बदल

तुमचं जर बँकेत खातं असेल तर लक्ष द्या! नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFC) आणि गृहनिर्माण वित्त कंपन्या (HFCs) यांच्या मुदत ठेवींशी संबंधित नियम 1 जानेवारी 2025 पासून बदलतील.

जीएसटीच्या नियमात बदल होतील

एक जानेवारी २०२५ पासून करदात्यांना कठोर GST नियमांना सामोरे जावे लागेल. एक महत्त्वाचा बदल म्हणजे अनिवार्य मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन (MFA). जीएसटी पोर्टलला भेट देणाऱ्या सर्व करदात्यांना हे हळूहळू लागू केले जाईल, यामुळे सुरक्षा वाढेल. हे पूर्वी केवळ २०० दशलक्ष रुपयांपेक्षा जास्त वार्षिक एकूण उलाढाल (AATO) असलेल्या व्यवसायांसाठी लागू होते.

एक जानेवारी २०२५ पासून युपीआय १२३ पे साठी व्यवहारासाठी मर्यादा वाढवली जाईल. आधी व्यवहाराची मर्यादा ५००० होती. आता एक जानेवारीपासून वाढवून १०,००० रुपये करण्यात येईल.

ईपीएफओ मेंबर्ससाठी एटीएमची सुविधा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) मध्ये नोंदणीकृत 7 कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाची विशेष भेट मिळणार आहे. कारण केंद्र सरकार नियमित डेबिट कार्डप्रमाणे एटीएममधून पीएफ काढण्याच्या सुविधेवर काम करत आहे.

शेतकऱ्यांना दिलासा

आरबीआयने १ जानेवारी २०२५ पासून शेतकऱ्यांना विना गॅरंटी कर्ज मिळेल. तसेच कर्जाची मर्यादा वाढवून २ लाख रुपये करण्यात येणार आहे. आधी कर्जाची मर्यादा १.६० लाख रुपये होते.

बीएसई आणि एनएसईच्या नियमात बदल

जानेवारीपासून सेन्सेक्स, बँकेक्स आणि सेन्सेक्स ५० ची मासिक एक्स्पायरी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी होईल. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) ने अलीकडेच एका परिपत्रकात म्हटलंय.

सेन्सेक्स, बँकेक्स आणि सेन्सेक्स ५० च्या एक्सपायरी तारखा १ जानेवारी २०२५ पासून सुधारित केल्या जातील. सेन्सेक्सचे साप्ताहिक करार शुक्रवारऐवजी दर आठवड्याच्या मंगळवारी संपतील. दरम्यान, एक्सचेंजने सांगितले की, सेन्सेक्स, बँकेक्स आणि सेन्सेक्स ५० चे मासिक करार प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी संपतील.

कारच्या किंमती वाढवण्याची शक्यता

नवीन वर्षात जानेवारीपासून कारच्या किंमतीही वाढण्याची शक्यता आहे. Maruti Suzuki, Tata Motors, Hyundai, Mahindra, Honda आणि Kia यांसारख्या अनेक प्रमुख वाहन निर्मात्या कंपन्या, मर्सिडीज-बेंझ, ऑडी आणि BMW सारख्या लक्झरी ब्रँडसह 1 जानेवारीपासून वाहनांच्या किमती 2 ते 4 टक्क्यांनी वाढवतील. कार निर्मात्या कंपन्या दर वाढीचं कारणही दिलंय. कार निर्मात्यांनी वाढीव उत्पादन खर्च, मालवाहतूक शुल्कात वाढ, वाढती मजुरी आणि परकीय चलनाची अस्थिरता याची कारणं सांगितली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 schedule : भारत-पाकिस्तान भिडणार, तारीख ठरली! आशिया चषक स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

SCROLL FOR NEXT