वाहन खरेदी केल्यानंतर विमा काढणं प्रत्येक वाहनधारकासाठी महत्त्वाचं असतं. पण वाहन विम्याच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. १५ डिसेंबरपासून वाहन विम्याची नवीन व्यवस्था लागू होणार असून, विमा पॉलिसीचे चार स्वतंत्र भाग केले जातील. त्यामुळे वाहनधारकांना नेमकं कोणतं संरक्षण मिळणार आहे, हे समजणं सोपं होईल. विशेष म्हणजे, यातले दोन विमे अनिवार्य असतील, तर दोन विमे ऐच्छिक असणार आहेत.
नव्या नियमानुसार वाहन विम्याचे चार प्रकार करण्यात आले आहेत. यामध्ये थर्ड पार्टी विमा, वैयक्तिक अपघात विमा, प्रवासी विमा आणि वाहनाचं नुकसान संरक्षण यांचा समावेश आहे.
१. थर्ड पार्टी विमा (तृतीय पक्ष विमा) : तर हा विमा अनिवार्य असतो. वाहनामुळे दुसऱ्या व्यक्तीला दुखापत झाली, मृत्यू झाला किंवा तिच्या मालमत्तेचं नुकसान झालं, तर त्याची भरपाई मिळायला हा विमा उपयोगी ठरतो.
२. वैयक्तिक अपघात विमा : वाहनमालक आणि विमाधारक चालकासाठी हा विमा अनिवार्य असेल. अपघातात वाहनमालकाचा मृत्यू किंवा अपंगत्व आल्यावर आर्थिक संरक्षण मिळतं.
३. प्रवासी विमा : प्रवासी विमा हा ऐच्छिक असतो. वाहनातून प्रवास करणाऱ्या पात्र प्रवाशांना अपघातामुळे अपघातामुळे दुखापत किंवा मृत्यू झाल्याने आर्थिक संरक्षण मिळू शकतं. कुटुंबासोबत प्रवास करणाऱ्यांसाठी हा पर्याय महत्त्वाचा ठरू शकतो.
४. वाहनाचे नुकसान संरक्षण : हा विमा सुद्धा ऐच्छिक असतो. अपघात, नैसर्गिक आपत्ती किंवा चोरीमुळे स्वतःच्या वाहनाचं नुकसान झाल्यावर भरपाई मिळवण्यासाठी हा विमा उपयोगी ठरू शकतो.
नव्या व्यवस्थेमुळे वाहनधारकांना विमा घेताना कोणत्या प्रकारचं संरक्षण हवं, हे स्वतंत्रपणे निवडता येणार आहेत. फक्त विमा काढला म्हणजे वाहनातले सर्व प्रवासी आणि स्वत:च्या वाहनालाही संरक्षण मिळतं, असं नाही. त्यामुळे अटी समजून घेतल्या पाहिजेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.