Palna Yojana Saam Tv
बिझनेस

Palna Yojana: लाडकीनंतर महिलांसाठी आणखी एक खास योजना, सरकारी महिलांना होणार फायदा, वाचा नेमका मास्टारप्लॅन

Palna Yojana For Female Employees: नोकरदार महिलांसाठी सरकारने खास योजना राबवली आहे. पाळणा योजना असं या योजनेचं नाव आहे. या योजनेत मुलांना पाळणा घरात सुरक्षित वातावरण मिळणार आहे.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारची महिलांसाठी खास पाळणा योजना

नोकरदार महिलांना मुलांच्या संगोपणासाठी पर्याय

मुलांसाठी पाळणा केंद्रे उभारणार

सुरक्षित वातावरण, शिक्षण आणि आधुनिक सुविधा उपलब्ध असणार

पहिल्या टप्प्यात ३४५ पाळणा केंद्र उभारणार

सध्या महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे. घर सांभाळून बाहेर नोकरी करतात. त्याचसोबत मुलांचा, कुटुंबाचा सांभाळ करतात. या काळात लहान मुल असताना नोकरी करताना महिलांची खूप धावपळ होते. त्यांना दोन्ही गोष्टी सांभाळताना खूप कठीण जाते. त्यामुळेच आता नोकरदार महिलांसाठी एक खास योजना सुरु केली जाणार आहे.

नोकरदार महिलांच्या मुलांना सुरक्षित वाटावे. याचसोबत त्यांचे योग्य संगोपन व्हावे, या उद्देशाने पाळणा योजना सुरु केली जाणार आहे. यामध्ये नोकरदार महिलांच्या मुलांना पोषण, शिक्षण आणि सुरक्षित वातावरण मिळणार आहे. या योजनेत लहान मुलांसाठी पाळणा घर सुरु केले जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात ३४५ पाळणा घरे

सरकारच्या या नवीन योजनेत पहिल्या टप्प्यात ३४५ पाळणा घर सुरु केले जाणार आहे. यासाठी लागणारा ६० टक्के निधी केंद्राकडून तर ४० टक्के राज्य सरकारकडून उपलब्ध करुन दिला जाणार आहे. केंद्र सरकारने २९ फेब्रुवारी २०२४ रोजी योजनेला मान्यता दिली होती. त्यानंतर आता ही योजना प्रत्यक्षात राबवली जाणार आहे.

पाळणा योजना नक्की आहे तरी काय? (What Is Palna Yojana By Maharashtra Government)

नोकरदार वर्गातील महिलांना आपल्या मुलांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी एक केंद्र उपलब्ध असणार आहे. मुलांना तिथे सुरक्षित वातावरण उपलब्ध असणार आहे.

सुरक्षित वातावरण

६ महिने ते ६ वर्षांच्या वयोगटातील मुलांसाठी डे केअर सुविधा

शिक्षण

३ वर्षांखालील मुलांना पूर्वी उद्दीपन आणि ३ ते ६ वर्षांच्या मुलांना पूर्व शालेय शिक्षण दिले जाईल

आहार

मुलांना सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळचा नाश्ता दिला जाईल

आरोग्य सेवा

नियमित आरोग्य तपासणी, लसीकरण आणि मुलांच्या वाढीवर लक्ष दिले जाणार आहे.

आधुनिक सुविधा

मुलांना वीज, पाणी, शौचालय अशा मुलभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: अजित पवार मुख्यमंत्री होणार, उद्धव ठाकरेंना हलक्यात घेऊ नका; ज्योतिषाचं भाकीत

Maharashtra Live News Update: पुण्यातील ससून रुग्णालयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आंदोलन

HDFC Bank : HDFCच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; २३ ऑगस्टला काही सेवा राहणार बंद

गणेश चतुर्थीला करा 'हे' उपाय; कर्जापासून मिळेल मुक्ती

Cyber Crime : व्हाट्सअपवर लग्न आमंत्रणाची एपीके फाईल; ओपन करताच खात्यातील रक्कम लंपास

SCROLL FOR NEXT