Credit Card Rule Saam TV
बिझनेस

New Rules From 1 June: एक जूनपासून बदलणार दिवस; खिशावर वाढणार भार, क्रेडिट कार्ड, एटीएमच्या व्यवहारात होणार बदल

ATM And Credit Card Rules: प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला बँकां आपल्या नियमात बदल करत असतात. जून महिन्यातही बँका आपल्या नियमात बदल करणार आहेत. त्याच बरोबर काही गोष्टींमध्ये बदल होत असतो. त्याचा परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार आहे.

Bharat Jadhav

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला बँका आपल्या व्यवहाराच्या नियमात बदल करत असतात. पुढील महिन्यापासून म्हणजेच 1 जून 2025 पासून काही नियम बदलणार आहेत. अनेक गोष्टींमध्ये बदल होणार आहे. एलपीजी गॅस सिलेंडर ते क्रेडिट कार्ड अशा गोष्टींच्या नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. जूनमध्ये ईपीएफओच्या बाबत नवीन नियम लागू होणार आहे. कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.

सरकार ईपीएफओची नवीन आवृत्ती 3.0 लाँच करणार आहे, ज्यामुळे पीएफ काढणे, डेटा अपडेट करणं आणि पैसे काढण्यासाठी क्लेम करणं सोपं होणार आहे. तसेच पीएफचे पैसे एटीएम कार्डमधून पैसे काढता येण्याची सुविधा देखील ईपीएफओमार्फत दिली जाणार आहे.

जूनपासून क्रेडिट कार्ड युजर्ससाठी अनेक महत्त्वाचे बदल लागू केले जाण्याची शक्यता आहे. ऑटो-डेबिट फेल्युअरवर 2% दंड, युटिलिटी बिलांवर आणि इंधन खर्चावर अतिरिक्त शुल्क, आंतरराष्ट्रीय व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क आणि रिवॉर्ड पॉइंट्स सिस्टममध्ये कपात होण्याची शकता आहे.

एटीएम व्यवहार नियमांमध्ये काही बदल होऊ शकतात. यामध्ये एटीएममधून पैसे काढण्याच्या शुल्कात वाढ होईल. म्हणजेच, एटीएममधून पैसे काढण्यासाठी नवीन शुल्क लागतील. एलपीजी सिलेंडरच्या किमतीत महत्त्वाचे बदल होतात. त्यामुळे 1 जून 2025 रोजी गॅस सिलिंडरची किंमत कमी किंवा वाढू शकते. 1 जून रोजी एफडी व्याजदरात वाढ किंवा घसरण होऊ शकते. बहुतेक बँका 6.5% ते 7.5% दरम्यान व्याज देत असल्या , जूनपासून हे दर देखील कमी होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

SCROLL FOR NEXT