New Royal Enfield Classic 350 Saam Tv
बिझनेस

नवीम स्टाइल, दमदार इंजिनसह येतेय नवीन Royal Enfield Classic 350, 12 ऑगस्टला होणार लॉन्च

New Royal Enfield Classic 350: क्लासिक 350 ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी बाईक आहे. पण आता ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन त्याचा नवा अवतार लवकरच बाजारात येणार आहे.

Satish Kengar

रॉयल एनफिल्ड आपल्या J-सिरीज प्लॅटफॉर्मवर नवीन फेसलिफ्टेड क्लासिक 350 तयार करत आहे. कंपनी या बाईकमध्ये अनेक मोठे बदल करत आहे. नवीन मॉडेलच्या डिझाइनमध्ये बरंच काही नवीन पाहायला मिळेल. ज्यासाठी त्याच्या बॉडी टँकपासून ते ग्राफिक्सपर्यंत बदल केले जात आहेत.

क्लासिक 350 ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी बाईक आहे. पण आता ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन त्याचा नवा अवतार लवकरच बाजारात येणार आहे. पण लॉन्च होण्यापूर्वीच या बाईकचे काही फीचर्स लीक झाले आहेत. या बाईकमध्ये तुम्हाला काय खास आणि नवीन मिळेल, हे जाणून घेऊ…

इंजिन

सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या क्लासिक 350 मध्ये 350cc चे पॉवरफुल्ल इंजिन आहे. हे इंजिन 20.2 bhp पॉवर आणि 27 Nm टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की, ही बाईक 32 kmpl पर्यंत सहज मायलेज देते. या बाईकमध्ये 6 प्रकार आणि आकर्षक रंग पर्याय असतील.

बाईकच्या सीटची उंची 805 मिमी आहे, जी खराब रस्त्यांवर चालण्यास मदत करते. पण कंपनी नवीन मॉडेलमध्येही तेच इंजिन अपग्रेड करणार आहे. याला मायलेजसोबत चांगला परफॉर्मन्सही मिळेल.

सध्याच्या मॉडेलमध्ये 13 लीटरची मोठी इंधन टाकी आहे, तर नवीन मॉडेलमध्येही हीच टाकी वापरली जाईल. बाईकचे वजन 195-198 किलो पर्यंत असू शकते. चांगल्या ब्रेकिंगसाठी बाईकला 300mm डिस्क फ्रंट डिस्क ब्रेक आणि रियर ड्रम किंवा डिस्क ब्रेक मिळू शकतात. नवीन मॉडेलमध्ये LED राऊंड हेडलाइट, LED टर्न इंडिकेटर आणि LED टेललाइट असेल.

कधी होणार लॉन्च?

सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या Classic 350 ची एक्स-शोरूम किमती 1.93 लाख रुपयांपासून सुरू होते. नवीन मॉडेलची किंमत थोडी जास्त असू शकते, असं बोललं जात आहे. नवीन क्लासिक 350 बाईक 12 ऑगस्ट रोजी लॉन्च होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ३० मिनिटात बनवा खमंग जिलेबी, नोट करा रेसिपी

Sushil Kedia : आम्ही जर आमच्या औकातीवर उतरलो तर...; दुसऱ्यांदा ट्वीट करत सुशील केडिया यांची राज ठाकरेंना धमकी

SCROLL FOR NEXT