किया या भारताच्या आघाडीच्या कार उत्पादक कंपनीने सर्वात प्रीमियम कॉम्पॅक्ट एसयूव्ही –नवीन सोनेट लॉन्च केलीय. या कारची किंमत तुमच्या बजेटमधली ठेवण्यात आली आहे. कियाच्या या दुसऱ्या क्रमांकाच्या बेस्ट-सेलिंग नवीन पुनरावृत्तीमध्ये २५ सुरक्षा फीचर्स आहेत. ज्यामध्ये १० स्वायत्त फीचर्स असलेले अप्रतिम एडीएएस आणि १५ मजबूत उच्च-सुरक्षा फीचर्स देण्यात आले आहेत. (Latest News)
या कारमध्ये‘फाइंड माय कार विथ एसव्हीएम’सहित ७० पेक्षा जास्त कनेक्टेड कार फीचर्स आहेत. ही कार १९ वेगवेगळ्या व्हेरीयन्टमध्ये उपलब्ध असणार आहे. ही कार ५ डिझेल मॅन्युअल व्हेरीयन्ट ९.७९ लाख रु. पासून सुरू होतात. डिझेल आणि पेट्रोल इंजिनच्या सर्वात वरच्या क्रमांकाच्या व्हेरीयन्टमध्ये १० स्वायत्त फंक्शन्स असलेली या सेगमेन्टमधली सर्वोत्तम एडीएएस लेव्हल १ आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
जीटी लाइन आणि एक्स-लाइन व्हेरीयन्टची किंमत पेट्रोलमध्ये अनुक्रमे १४.५० लाख रु. आणि १४.६९ लाख रु. आहे, तर डिझेलमध्ये १५.५० लाख आणि १५.६९ लाख रु. आहे. ज्या ग्राहकांना ही कार घ्यायची आहे ते किया इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवरुन तसेच किया इंडियाच्या अधिकृत डीलरशिपकडे २५००० रु. प्रारंभिक बुकिंग किंमत देऊन नवीन सोनेट बुक करू शकतात.
काय आहेत फीचर्स
कॉम्पॅक्ट एसयूव्हीची ही नवीनतम आवृत्ती भारतीय ग्राहकांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी आहे. ड्रायव्हिंगचा सुरक्षित अनुभव देणाऱ्या या गाडीच्या सर्व व्हेरीयन्टमध्ये दमदार १५ उच्च-सुरक्षा फीचर्स आहेत. ६ एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल आणि स्टेबिलिटी मॅनेजमेंट आदी गोष्टी देण्यात आल्यात. सोनेटपासून सुरुवात करत कियाने आता आपल्या संपूर्ण उत्पादन पोर्टफोलिओमध्ये ६ एअरबॅग दिल्यात.
ड्युअल स्क्रीन कनेक्टेड पॅनल डिझाईन, रियर डोर सनशेड कर्टन आणि सर्वदारांना सुरक्षेसह पॉवर विंडो वन टच ऑटो अप-डाऊन दिलेत. या नवीन सोनेटमध्ये आता नवीन ग्रिल आणि नवीन बंपर डिझाईन दिली आहे. क्राऊन ज्वेल एलईडी हेडलॅम्प, आर१६ क्रिस्टल कट अलॉय व्हील्स आणि स्टार मॅप एलईडी कनेक्टेड टेल लॅम्प आहेत.
या कारमध्ये तंत्रज्ञान असलेले डॅशबोर्ड, एलईडी अॅम्बीयन्ट साऊंड लाइटिंग, २६.०४ सेमी (१०.२५”)कलर एलसीडी एमआयडी आणि २६.०३ सेमी (१०.२५”) एचडी टचस्क्रीन नेव्हीगेशन असलेले ड्युअल स्क्रीन कनेक्टेड पॅनल डिझाईन फुल डिजिटल क्लस्टर, स्टीयरिंग व्हीलवर नवीन जीटी लाइन लोगो आणि इन्टिरियरमध्ये १ नवीन रंगासह ५ रंगांचे पर्याय असे लक्झुरियस इन्टिरियर्स देण्यात आली आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.