बिझनेस

Odysse Sun: दमदार फीचर्ससह नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, एका चार्जमध्ये १३० किमीची रेंज आणि बजेट-फ्रेंडली किंमत

Odysse Sun Electric scooter: या स्कूटरच्या बॅटरी AIS १५६ प्रमाणित असून सुरक्षित आहेत. दोन वेगवेगळ्या बॅटरी पॅकसह उपलब्ध ही स्कूटर आता कंपनीकडून अधिकृत बुकिंगसाठी खुले करण्यात आली आहे.

Dhanshri Shintre

  • ओडिसीने भारतात नवीन इलेक्ट्रिक स्कूटर 'सन' लाँच केली.

  • २५०० W मोटर आणि १३० किमी पर्यंत रेंजसह उपलब्ध.

  • कीलेस स्टार्ट, डिजिटल क्लस्टर, एलईडी लाइटिंग आणि तीन रायडिंग मोड्स.

  • चार रंगांच्या पर्यायांसह प्लस-साईज एर्गोनॉमिक डिझाइन आणि आरामदायी राइड.

देशातील आघाडीची इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी ओडिसीने भारतीय बाजारात आपल्या वाहनांच्या पोर्टफोलिओचा विस्तार करत नवीन इलेक्ट्रिक स्कूटर 'ओडिसी सन' अधिकृतपणे लाँच केली आहे. आकर्षक लूक आणि शक्तिशाली बॅटरी पॅकसह सुसज्ज, ही स्कूटर ८१,००० रुपयांपासून सुरू होते, तर टॉप मॉडेलची किंमत ९१,००० रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत आहे.

ओडिसी सनमध्ये प्लस-साईज एर्गोनॉमिक डिझाइन दिले असून, जे आरामदायी राइड आणि स्पोर्टी लूक दोन्ही प्रदान करते, असे कंपनीने सांगितले आहे. स्कूटर चार रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे – पॅटिना ग्रीन, गनमेटल ग्रे, फँटम ब्लॅक आणि आइस ब्लू. यामध्ये कीलेस स्टार्ट-स्टॉप, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि डबल फ्लॅश रिव्हर्स लाईटसारखी आधुनिक वैशिष्ट्ये आहेत. स्कूटरमध्ये ड्राइव्ह, पार्किंग आणि रिव्हर्स असे तीन रायडिंग मोड्स आहेत, जे दैनंदिन वापरासाठी उपयुक्त ठरतात.

ओडिसी सनमध्ये एलईडी लाइटिंग, एव्हिएशन-ग्रेड सीटिंग आणि सीटखाली ३२ लिटर स्टोरेज स्पेस आहे. समोर टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेंशन आणि मागील बाजूस हायड्रॉलिक मल्टी-लेव्हल अॅडजस्टेबल रिअर शॉक अ‍ॅब्सॉर्बर सस्पेंशन दिले आहे, तर ब्रेकिंगसाठी पुढील आणि मागील बाजूस डिस्क ब्रेक उपलब्ध आहेत.

स्कूटरमध्ये २५०० वॅटची इलेक्ट्रिक मोटर वापरण्यात आली आहे आणि ती सुमारे ताशी ७० किमीचा जास्तीत जास्त वेग गाठू शकते. ओडिसीने ही स्कूटर दोन वेगवेगळ्या बॅटरी पॅकसह (१.९५ किलोवॅट तास आणि २.९ किलोवॅट तास) सादर केली आहे, ज्या लहान पॅकसह ८५ किमी आणि मोठ्या पॅकसह १३० किमी ड्रायव्हिंग रेंज देतात. कंपनीने बॅटरी AIS १५६ प्रमाणित असल्याचे सांगितले असून, पूर्ण चार्ज होण्यासाठी ४ ते ४.५ तास लागतात.

ओडिसी सनची सुरुवातीची किंमत किती आहे?

ओडिसी सनची सुरुवातीची किंमत ८१,००० रुपये (एक्स-शोरूम) आहे.

या स्कूटरमध्ये किती ड्रायव्हिंग रेंज आहे?

लहान बॅटरीसह ८५ किमी आणि मोठ्या बॅटरीसह १३० किमी रेंज मिळते.

स्कूटरमध्ये कोणकोणते रायडिंग मोड्स आहेत?

ड्राइव्ह, पार्किंग आणि रिव्हर्स हे तीन रायडिंग मोड्स आहेत.

बॅटरी किती वेळात चार्ज होते?

ही बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी ४ ते ४.५ तास लागतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Child Birth Rate : लोकसंख्या वाढीसाठी 'या' देशाचा मोठा निर्णय; मुलाच्या जन्मासाठी मिळणार तब्बल ६ लाख रुपये

Maharashtra Live Update: मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Latur Tourism : विकेंड गेटवे! लातूरमधील किल्ले, मंदिरे आणि निसर्गरम्य ठिकाणं तुमची वाट पाहतायेत, लगेचच द्या भेट

Chetana Bhat: असं रुप पाहिलं अन् मन गहिरवरुन आलं...

Viral Video: लखनऊ - बरौनी एक्सप्रेसमध्ये सापडल्या 325 दारूच्या बाटल्या; रेल्वे प्रशासनाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT