Namo Shetkari Installment Update  saam tv
बिझनेस

Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी योजनेचे २ हप्ते रखडले! ९२ लाख शेतकऱ्यांना ४ हजार रुपये कधी मिळणार?

Namo Shetkari Installment Update : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे नववे आणि दहावे हप्ते रखडले आहेत. याबाबत अपडेट समोर आली आहे.

Sakshi Sunil Jadhav

Namo Shetkari Yojana: राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवून त्यांना आर्थिक मदत केली जाते. त्यातीलच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या नवव्या आणि दहाव्या हप्त्यांची शेतकरी लाभार्थी वाट पाहत आहेत. हे दोन्ही हप्ते मिळाल्यावर पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात एकूण चार हजार रुपये जमा होणं अपेक्षित आहे. पण निधी मंजुरी आणि वितरणाच्या तारखेबद्दल अजून स्पष्टता नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रतीक्षा कायम आहे.

३,७०० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. याचा निधी तीन समान हप्त्यांत शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवला जातो. म्हणजेच, प्रत्येक हप्त्यात दोन हजार रुपये दिले जातात. केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेला पूरक म्हणून महाराष्ट्र सरकारने ऑक्टोबर २०२३ मध्ये या योजना सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नमो शेतकरी योजनेचे नववा आणि दहावा हप्ता वितरित करण्यासाठी ३ हजार ७०० कोटी रुपयांचा निधी गरजेचा आहे. यासंदर्भातला प्रस्ताव मार्च आणि जुलै महिन्यात शासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र, या प्रस्तावांना मंजुरी कधी मिळणार, याबद्दल अजून अधिकृत निर्णय समोर आलेला नाही.

९२ लाख शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा

राज्यात या योजनेचे ९२ लाख पात्र लाभार्थी असल्याचं सांगितलं जातयं. पण आधार क्रमांक किंवा बँक खात्याशी संबंधित त्रुटी असेल तर काही शेतकऱ्यांना अनुदान मिळायला भरपूर अडचणी येऊ शकतात. त्यामुळे निधी मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्यांची पडताळणी आणि वितरणाची प्रोसेस महत्त्वाची ठरेल.

पैसे खात्यात कधी जमा होणार?

दुष्काळी परिस्थिती, पिकांचं नुकसान आणि शेतीच्या वाढत्या खर्चामुळे शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत रखडलेले चार हजार रुपये मिळाल्यास त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. मात्र, नवव्या आणि दहाव्या हप्त्यांच्या वितरणाची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारच्या अधिकृत घोषणेकडे लक्ष ठेवावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Short Kurti Designs: महिलांसाठी शॉर्ट कुर्तीच्या लेटेस्ट डिझाईन, बॅकलेसपासून ते हॉल्टरनेकपर्यंत हे 5 पॅटर्न ट्रेंडमध्ये

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; आरोपींची तळोजा कारागृहात रवानगी

Mega Block : रविवारी प्रवाशांचे मेगाहाल होणार! तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; वाचा वेळापत्रक

Rice or Chapati: भात की चपाती? शरीराला जास्त एनर्जी, फायबर आणि प्रोटीन कशातून मिळते? जाणून घ्या ७ गोष्टी

Railway Block : देहूरोड–बेगडेवाडी दरम्यान उद्या रेल्वे ब्लॉक; लोकल रद्द, एक्सप्रेस गाड्यांच्या वेळेत बदल

SCROLL FOR NEXT