namo shetkari scheme saam tv
बिझनेस

Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते प्रलंबित, शेतकऱ्यांच्या खात्यात ₹4,000 कधी येणार?

Namo Shetkari 9th installment : नमो शेतकरी योजनेचे नववा आणि दहावा हप्ता मिळून ४ हजार रुपयांचा अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात आलेला नाही.

Sakshi Sunil Jadhav

Namo Shetkari Yojana: महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीआधी ५ हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हप्ते अजून रखडलेले असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जातेय. दु्ष्काळी मदत जाहीर झाली, मग योजनेचे थकीत पैसे कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होतोय.

नमो शेतकरी योजनेत वर्षाला मिळतात ६ हजार रुपये

महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेतूनही वर्षाला ६ हजार रुपये मिळतात. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना दोन्ही योजनांमधून एकूण १२ हजार रुपयांची मदत मिळते. नमो शेतकरी योजनेची रक्कम प्रत्येकी २ हजार रुपयांच्या तीन हप्त्यांत दिली जाते.

दोन हप्त्यांचे ४ हजार रुपये रखडलेले

नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता मार्च २०२६ मध्ये वितरित करण्यात आला होता. त्यावेळी ८९ लाख ७५ हजार २९८ शेतकऱ्यांच्या खात्यांवर एकूण १,७९८.७८ कोटी रुपये जमा करण्यात आले होते. मात्र, उपलब्ध माहितीनुसार नवव्या आणि दहाव्या हप्त्याचे प्रत्येकी २ हजार रुपये असे एकूण ४ हजार रुपये रखडलेले आहेत. नववा हप्ता डिसेंबर २०२५ ते २०२६ या कालावधीसाठी, तर दहावा हप्ता एप्रिल ते जुलै २०२६ या कालावधीसाठी आहे.

हप्त्यांच्या तारखेबाबत अधिकृत घोषणा नाही

पीएम किसान योजनेचे पैसे नियमित मिळत असताना नमो शेतकरी योजनेचे हप्ते रखडल्यामुळे शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जातेय.

दुष्काळी मदतीची घोषणा झाली असली, तरी रखडलेले हप्ते कधी जमा होणार, याबाबत अधिकृत तारीख जाहीर झाल्याची माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाच्या अधिकृत घोषणेकडे लक्ष ठेवणं आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सवात काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT