Sakshi Sunil Jadhav
बऱ्याच घरांमध्ये तूपाचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. पण त्याचा योग्य पद्धतीने वापर करून अनेक गंभीर समस्यांपासून सुटका मिळू शकते.
तूपाचा वापर केल्याने कोरडी त्वचेच्या समस्या, झोप अपूर्ण राहणं आणि आरोग्याच्या समस्या कमी होतात.
पायांच्या तळव्यांना आणि टाचांना तूप लावल्याने त्वचेतला ओलावा टिकून राहायला मदत होते आणि त्वचा मऊ राहते.
जर तुमच्या टाचा दुखत असतील, कडक किंवा खरखरीत झाल्या असतील तर, टाचांवर थोडं तूप लावल्यावर काहीच दिवसात टाचात मऊपणा जाणवेल.
ज्यांना दिवसभराचं काम करून थकवा आलेला असतो तरीही रात्री झोप येत नसेल तर पायाला तूप लावल्यावर शांत झोप मिळेल.
दिवसभर उभं राहिल्यानंतर किंवा चालल्यानंतर हलक्या हाताने मालिश केल्याने पायांना आराम मिळू शकतो.
झोपण्याआधी पाय स्वच्छ धुवून घ्या. मग पाय कोरड्या करड्याने पुसा आणि तूप थोडं गरम करून अर्धा ते १ चमचा हातात घेऊन हलक्या हाताने तळवे, टाचा आणि भागांवर मालिश करा.
तूप खूप गरम वापरू नका आणि खाज, लालसरपणा किंवा पुरळ असेल तर वापरू नका. अशा वेळेस डॉक्टरांचा सल्ला घ्या.
साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.