Drone Didi Scheme Saam tv
बिझनेस

Drone Didi Scheme: महिलांना महिन्याला मिळणार १५००० रुपये, ८ लाख रूपयांची सबसिडी, ड्रोन दीदी योजनाबद्दल जाणून घ्या

Drone Didi Scheme News: केंद्र सरकारने महिलांसाठी खास ड्रोन दीदी योजना राबवली आहे. या योजनेत महिलांना ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण मिळते. त्याचसोबत स्वतः ला ड्रोन घेण्यास ८ लाखांची सब्सिडी दिली जाते.

Siddhi Hande

देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, त्यांना स्वतः च्या पायावर उभं करण्यासाठी सरकार नेहमीच अनेक योजना राबवत असतात. महिलांना आर्थिक मदत मिळावी आणि रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी योजना आहेत. यातीलच एक योजना म्हणजे ड्रोन दीदी योजना.

ड्रोन दीदी योजनेत महिलांना रोजगाराची संधी मिळते. त्यामुळे त्यांना आर्थिक मदतदेखील मिळते. ड्रोन दीदी योजनेत महिलांना स्वतः च्या पायावर उभं राहण्यासाठी प्रोत्साहन देते.

या योजनेत महिलांना ड्रोन दिले जातात. याचसोबत ड्रोम उडवण्याचे प्रशिक्षणदेखील दिले जाते. याचसोबत महिलांना ८ लाखांची सब्सिडी दिली जाते.

या योजनेत आतापर्यंत १० कोटी महिला स्वंय सहायता समूहाशी जोडल्या गेल्या आहेत. जवळपास १४,५०० महिलांना ड्रोन दिले जाणार आहे. याचसोबत ८ लाखांची सब्सिडी दिली जाणार आहे.

नमो ड्रोन दीदी योजनेत महिलांना ड्रोन उडवण्याची ट्रेनिंग दिली जाणार आहे.ड्रोनच्या वापरामुळे कृषी क्षेत्रात आधुनिक गोष्टींचा वापर करता येणार आहे. यामुळे शेतीला खूप फायदा होणार आहे.२०२३ मध्ये ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत बचत गटाशी संबंधित महिलांना १५००० रुपये दिले जातात. ज्या महिला ड्रोन दीदी म्हणून काम करतील त्यांनाच हे मानधन मिळणार आहे.

याचसोबत सरकार महिलांना ड्रोन खरेदी करण्यासाठी सब्सिडीदेखील देते. सरकार ड्रोनच्या किंमतीची ८० टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त ८ लाख रुपये अनुदान म्हणून देते. याचसोबत उरलेल्या रक्कमेसाठी कर्जदेखील उपलब्ध करुन दिले जाते. या कर्जाची परतफेड फक्त ३ टक्के व्याजदराने करावी लागणार आहे.या ड्रोनच्या मदतीने बचत गट दरवर्षी अतिरिक्त १ लाख रुपये कमाई करु शकतात. या ड्रोन किटमध्ये एक ड्रोन बॉक्स, चार अतिरिक्त बॅटरी आणि चार्जिंग हब मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT