Mumbai CNG Rates Hike News  AI Image
बिझनेस

मोठी बातमी! मुंबईत सीनीएजीचे दर पुन्हा वाढले, आज मध्यरात्रीपासून नवे दर, आता किती किंमत मोजावी लागणार?

Mumbai CNG Price Hike : मुंबई आणि उपनगरांमध्ये सीएनजीच्या दरात प्रति किलो १.५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नवा दर ९१.५० रुपये झाला आहे. महानगर गॅसचे नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.

Namdeo Kumbhar

Mumbai CNG Rates Hike News : पुणे, पिंपरी चिंचवड आणि नाशिकनंतर आता मुंबईतही सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. महानगर गॅसने मुंबई आणि उपनगरात सीएनजीच्या दरात १ रूपया ५० पैशांची वाढ कऱण्याचा निर्णय घेतला आहे. आज मध्यरात्रापासून नवीन दर लागू होणार आहे. जीएनजीच्या किंमती वाढल्यामुळे टॅक्सी आणि रिक्षाचा प्रवास महागण्याची शक्यता आहे. Compressed Natural Gas (CNG)

महागनर गॅसने सीएनजीच्या दरात प्रति किलो 1.50 रूपयांची वाढ केली. त्यामुळे सीएनजीची किंमत ९१.५० रूपये प्रति किलोवर पोहोचली. दिवाळीच्या आधी एक नोव्हेंबर रोजी महानगर गॅसकडून सीएनजीच्या दरत प्रति किलो एक रूपयांची वाढ करण्यात आली होती. आता दिवाळी झाल्यानंतर पुन्हा एकदा सीएनजीच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला.

सीएनजीची किंमत का वाढली?

महानगर गॅसने प्रसिद्धिपत्रात सीएनजीचे दर वाढवण्याचे कारणही दिलेय. एमजीएलच्या म्हणण्यानुसार, मध्य पूर्वेतील सध्याच्या संकटामुळे वाढलेला खरेदी खर्च, देशांतर्गत गॅस वाटपात झालेली घट आणि महागड्या आयातित रीगॅसिफाइड लिक्विफाइड नॅचरल गॅस (RLNG) वरील वाढलेले अवलंबित यामुळे दरात सुधारणा करण्यात आली. उत्पादन खर्चातील वाढीची अंशतः भरपाई करणे आणि त्याच वेळी ग्राहकांना सीएनजीचा अखंड व शाश्वत पुरवठा सुनिश्चित करणे, या उद्देशाने ही दरवाढ करण्यात आल्याचेही महानगर गॅसने म्हटलेय.

मुंबईत १५ दिवसांच्या आत सीएनजी दरात दुसरी दरवाढ

ताज्या दरवाढीमुळे मुंबईत १५ दिवसांच्या कालावधीत सीएनजीच्या दरात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. त्यामुळे दैनंदिन प्रवासासाठी या इंधनावर अवलंबून असलेल्या वाहनचालकांवर आणि प्रवाशांवर आर्थिक भार वाढला आहे. पुणे आणि नाशिकमध्ये गुरूवारी सीएनजीच्या दरात एक रूपयांची वाढ करण्यात आली होती. आता आज मुंबईमध्ये ही दरवाढ कऱण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UP Election: INDIA आघाडीत धुसफूस? जागावाटपावरून काँग्रेसचा मित्रपक्ष नाराज? अखिलेश यादवांच्या विधानाने चर्चांना उधाण

8 व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट; केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 1 जानेवारी 2026 पासून थकबाकी मिळणार?

Ind vs NZ : कसोटी मालिकेआधीच भारतीय संघात मोठा बदल; कुलदीप यादवला मायदेशी धाडलं, नव्या खेळाडूची अचानक एन्ट्री

Maharashtra News Live Update: कोथरुडमध्ये १००० हून अधिक नवजात बालकांचा बालदिन सोहळा

Aloo Matar Masala Recipe: हॉटेलसारखी चविष्ट आलू मटर मसाला भाजी घरीच बनवा, वाचा 'ही' सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT