दिवाळीनंतर महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून अनेकजण सीएनजीचा वापर करतात. पण आता सीएनजीच्या किंमतीतही वाढ झालीये. मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातल्या वाहनधारकांना याचा फटका बसणार आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात प्रति किलो १.५० रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे सीएनजीचे नवे दर किती झाले आणि या दरवाढीचा सर्वसामान्यांच्या खिशावर किती परिणाम होईल हे जाणून घेऊयात.
महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात प्रति किलो १.५० रुपयांची वाढ केली. या दरवाढीनंतर मुंबई आणि आसपासच्या परिसरात सीएनजीचा दर ९१.५० रुपये प्रति किलो झाला. सुधारित दर रविवारपासून लागू करण्यात आले. त्यामुळे सीएनजीवर धावणाऱ्या वाहनांसाठी आता जास्त पैसे मोजावे लागतील.
यंदाच्या वर्षात सीएनजीने ही आठव्यांदा दर वाढ केली. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत सीएनजीचा दर ८०.५० रुपये प्रति किलो होता. पण गेल्या ११ महिन्यात दरात ११ रुपयांची वाढ झाली. याआधी पुणे, नाशिक आणि धुळ्यात सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ केली होती.
CNG च्या दरवाढीचा सर्वात जास्त परिणाम रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर होईल. दररोज वाहन चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या चालकांचा इंधनावरचा खर्च वाढणार आहे. परिणामी त्यांच्या रोजच्या कमाईवर परिणाम होऊ शकतो.
महानगर गॅस लिमिटेडच्या माहितीनुसार, नैसर्गिक वायूच्या खरेदी खर्चात वाढ झाल्याने CNG च्या किमती वाढवण्यात आल्या. जागितक स्तरावरच्या भू-राजकीय तणावामुळे गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम होतोय. तसेच सरकारकडून मिळणाऱ्या स्वस्त देशांतर्गत नैसर्गिक वायूच्या वाटपात घट झाल्याचाही परिणाम इंधनाच्या किमतींवर झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.