Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana:लाडकी बहीण योजनेत मोठा बदल; आता याच महिलांचे अर्ज मंजूर होणार

Ladki Bahin Yojana New Rule: लाडकी बहीण योजनेचा लाभ आतापर्यंत लाखो महिलांनी घेतला आहे. या योजनेच्या नियमांमध्ये आता बदल करण्यात आले आहेत.

Siddhi Hande

राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जात आहे. जुलै महिन्यापासून ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत अनेक महिलांच्या अकउंटला पैसे जमा झाले आहेत तर अजूनही अनेक मपहिलांना पैसे आले नाही. दरम्यान राज्य सरकारने या योजनेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज अंगणवाडी सेविकांकडूनच मंजूर केले जाती, असा निर्णय घेण्यात आला आहे. महिला व बाल विकास विभागाने याबाबत माहिती दिली आहे.

लाडकी बहीण योजनेच्या या नवीन नियमानुसार फक्त अंगणवाडी सेविकाच या योजनेच्या अर्जांना मंजुरी देते.याआधी योजनेचे अर्ज मंजूर करण्याचे काम ११ प्राधिकृत व्यक्तींना देण्यात आले आहे. मात्र, आता या निर्णयात बदल करण्यात आला आहे. आता फक्त अंगणवाडी सेविकाच या अर्जांना मंजूर देऊ शकणार आहेत.

मागील काही दिवसांमध्ये एका व्यक्तीने पत्नीच्या नावाने ३० अर्ज दाखल केले होते. त्यातील २६ अर्ज मंजूरदेखील झाले होते. त्यामुळेच राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यातील अर्जांना केवळ अंगणवाडी सेविकांकडूनच मंजूरी मिळणार आहे.

लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० ऑगस्ट होती. मात्र, आता ही तारीख वाढवून ३० सप्टेंबर करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना सप्टेंबर महिन्यात अर्ज करावेत. आतापर्यंत अनेक महिलांच्या खात्यात २ महिन्याचे ३००० रुपये जमा झाले आहेत. परंतु काही महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले नाही. ज्या महिलांचे बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक नाही त्या महिलांच्या अकाउंटला पैसे आले नाहीत. त्यामुळेच महिलांना अकाउंट लिंक करण्यास सांगण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

SCROLL FOR NEXT