recovery from 14000 ineligible beneficiaries in ladki bahin yojana google
बिझनेस

Ladki Bahin Yojana : 'लाडकी'बाबत मोठी अपडेट, अपात्र ठरलेल्या १४ हजार जणांकडून होणार पैशांची वसुली, मुख्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

Ladki Bahin Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. ज्या अपात्र महिलांना योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांच्याकडून आता वसुली होणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या महाराष्ट्रात खूप चर्चेत आहे. याबाबत अनेक अपडेट्स समोर येत आहेत. या योजनेत महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात होते. मात्र योजनेसाठी ज्या महिला पात्र नव्हत्या त्यांनीही या योजनेचा लाभ घेतला. धक्कादायक म्हणजे यात महिलाच नाही तर पुरुषांचाही समावेश असल्याची माहिती मुख्यंमत्र्यांनी दिली.

लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना फडणवीसांनी माहिती सांगितली. ते म्हणाले, '' जेव्हा लाडक्या बहिणींची केवायसी करून तपासणी केली, तेव्हा मिळालेल्या रिपोर्टनुसार, जवळपास १४००० लाभार्थी पुरुष हे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. तसेच पाच लाख सरकारी कर्मचारी महिला, १० लाख आयकर टॅक्स भरणाऱ्या महिला आणि ४ ते ५ लाख महिलांच्या घरात गाड्या अशा लाभार्थ्यांचा त्यात समावेश आहे.''

पुरुषांकडून वसुली होणार - देवेंद्र फडणवीस

लाडकी बहीण योजनेचा हप्ता ज्या पुरुषांच्या खात्यावर गेलाय त्यांच्यासाठी ही माहिती महत्वाची आहे. मुख्यमंत्री या प्रश्नावर म्हणाले की, ''ज्यांनी अजुनही लाडक्या बहिण योजनेसंबंधी केवायसी केलेली नाही, त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही, जर आपण अपात्र व्यक्तींना पैसे देत राहिलो, तर सीएजी (CAG) नक्कीच पैसे परत मागतील. जे अत्यंत वाईट आहे.'' तर मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला की, जे अपात्र असुनसुद्धा योजनेचा लाभ घेत होते, त्यांना एकदा सूट दिली जाईल. पण पुरुषांना यातून वगळण्यात येईल. तसेच त्यांच्याकडून पैसे वगळण्यात येतील.

लाडकी बहीण योजनेची पात्रता

जेव्हा योजना सुरु केली तेव्हाच त्याची पात्रता सांगण्यात आली होती. तसेच पात्र महिलांनाच याचा लाभ मिळणार असं सांगण्यात आलं होतं. पण काही महिलांनी या अटी पाळल्या नाहीत. त्यामुळे त्यांना याचा लाभ बंद झाला. तसेच काही महिलांनी ईकेवायसी प्रोसेस पूर्ण केली नाही. याची शेवटची तारीख ही ३१ एप्रिल होती. त्यानंतर कोणत्याच महिलेला ईकेवायसीची परवानगी दिली जाणार नाही. असं दृश्य सध्या पाहायला मिळतयं. यासंबंधी कोणतंही वक्तव्य अद्याप समोर आलेलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Pune News: माझ्या बॉयफ्रेंडला एड्स आहे, तरी मी त्याच्याशीच लग्न करणार, पुण्यामध्ये कॉलेजला गेलेली २२ वर्षीय तरुणी बेपत्ता

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

SCROLL FOR NEXT