Ladki Bahin Yojana SAAM TV
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीला कधी मिळणार पुढचा हप्ता, बदलेले नियम माहित आहेत का?

Ladki Bahin Yojana 6th Instalment Update : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' हिचा सहावा हप्ता कधी येणार जाणून घ्या.

Shreya Maskar

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी महाराष्ट्र सरकार नवनवीन योजना घेऊन येते. महिलांना आर्थिक मदत व्हावी हाच त्यामागील मुख्य हेतू असतो. यातूनच विविध योजना सरकार राबवते. 'माझी लाडकी बहीण योजना' ही त्याचाच एक भाग आहे.

'माझी लाडकी बहीण योजना' (Ladki Bahin Yojana) अंतर्गत दिवाळीच्या मुहूर्तावर सरकारकडून योजनेत समाविष्ट असलेल्या महिलांना चौथा आणि पाचवा हप्ता देण्यात आला. ही रक्कम 3000 रुपये होती. जी महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली. आता महिला सहाव्या हप्त्याची वाट पाहत आहे. या संदर्भातील अपडेट जाणून घेऊयात.

राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच लागला आहे. त्यामुळे आता महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या योजनेचा पुढील हप्ता नव्या सरकारच्या शपथविधीनंतरच लाडक्या बहिणीला मिळणार होता. 5 डिसेंबर 2024 रोजी शपथविधी सोहळा पार पडला. आता लवकरच सहाव्या हप्त्याचे पैसे लाडक्या बहि‍णींना मिळणार असे बोले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 15 डिसेंबरनंतर सहावा हप्ता मिळेल असे बोले जात आहे. कारण नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात यासंबंधित निर्णय होण्याची शक्यता आहे.

अलिकडेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'माझी लाडकी बहीण योजना' बाबत मोठी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, "या योजनेत समाविष्ट महिलांची पात्रता तपासली केली जाणीर आहे. पडताळणीनंतर, ज्या महिला पात्र नाहीत त्यांना योजनेच्या लाभार्थी यादीतून काढून टाकले जाईल."

'माझी लाडकी बहीण योजना' पात्रता नियम

  • ज्या महिलांनी 'माझी लाडकी बहीण योजना' अंतर्गत अर्ज केला आहे. ती महिला राज्याची रहिवासी असावी.

  • महिलेचे वय 21 ते 65 वर्षांमध्ये असावे.

  • महिलेचे बँक खाते असणे आवश्यक आहे.

  • बँक खाते मोबाईल क्रमांक आणि आधारशी लिंक असावे.

  • महिला जवळच्या CSC केंद्र, अंगणवाडी, ग्रामपंचायत येथे जाऊन अर्ज करू शकतात.

  • अर्ज करणाऱ्या महिलेकडे पत्त्याचा पुरावा, आधार कार्ड, बँक स्टेटमेंट यासारखी आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anger damages Heart: तणावापेक्षा धोकादायक राग! केवळ ८ मिनिटांचा राग वाढवतोय हार्ट अटॅकचा धोका

Maharashtra Live News Update: आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरूवात

Filmmaker Death : प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचं निधन, घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, बॉलिवूडवर शोककळा

ज्येष्ठ खासदाराचे दुर्दैवी निधन, फुटबॉल खेळताना मैदानातच कोसळले, देशावर शोककळा!

Todays Horoscope: आज या राशींनी ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT