Muhurat Trading Saam Tv
बिझनेस

Muhurat Trading: दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ट्रेडिंगला सुरुवात; सेन्सेक्सने घेतली 500 अंकांची उसळी, निफ्टी 100 अंकांनी वर

Diwali 2023 Muhurat Trading: दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ट्रेडिंगला सुरुवात; सेन्सेक्सने घेतली 500 अंकांची उसळी, निफ्टी 100 अंकांनी वर

Satish Kengar

Diwali 2023 Muhurat Trading:

दिवाळीनिमित्त मुहूर्त ट्रेडिंगवर शेअर बाजारात मोठी तेजी आल्याचं पाहायला मिळत आहे. प्री-ओपन मार्केटमध्ये सेन्सेक्सने 500 अंकांचा टप्पा ओलांडला असून निफ्टीतही वाढ दिसून आली आहे. बाजार उघडल्यानंतरही सेन्सेक्स आणि निफ्टीची वाढ कायम होती.

यात सेन्सेक्स 500 हून अधिक अंकांच्या वाढीसह 65,400 अंकांच्या पुढे व्यवहार करताना दिसत आहे. त्याचप्रमाणे निफ्टीने 100 अंकांची उसळी घेत 19,550 अंकांची पातळी गाठली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'शुभ मुहूर्तावर ट्रेडिंग केल्याने वर्षभर समृद्धी येते, असे मानले जाते. हिंदू कॅलेंडर वर्ष दिवाळीपासून सुरू होते, ज्याला संवत म्हणतात. यामुळे व्यापारी या दिवशी व्यापार करणे शुभ मानतात. यातच आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंगचा दिवशी शुक्रवारी सेन्सेक्स 72.48 अंकांच्या किंवा 0.11 टक्क्यांच्या वाढीसह 64,904.68 अंकांवर बंद झाला. व्यापारादरम्यान तो 251.25 अंकांवर घसरला होता. त्याचप्रमाणे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टीही 30.05 अंकांच्या किंवा 0.15 टक्क्यांच्या वाढीसह 19,425.35 अंकांवर बंद झाला. (Latest Marathi News)

शुक्रवारी संपलेल्या संवत वर्ष 2079 दरम्यान, BSE सेन्सेक्स 5,073.02 अंकांनी किंवा 8.47 टक्क्यांनी वाढला, तर निफ्टी 1,694.6 अंकांनी किंवा 9.55 टक्क्यांनी वधारला. या कालावधीत, BSE सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 43.81 लाख कोटींनी वाढून 3,20,29,232.24 कोटी झाले.

मंगळवारी बाजार बंद राहणार

सोमवार ते शुक्रवार पुढील आठवड्यात फक्त 4 ट्रेडिंग दिवस असतील. दिवाळी बलिप्रतिपदेनिमित्त मंगळवारी बाजारपेठा बंद राहणार आहेत. गेल्या आठवड्यात, बीएसई सेन्सेक्स 540.9 अंक किंवा 0.84 टक्क्यांनी आणि निफ्टी 194.75 अंकांनी किंवा 1 टक्क्यांनी वधारला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT