Viral News On Recharge Charge 20 Rupees  economics times
बिझनेस

Mobile Recharge: काय सांगता! 20 रुपयांत 4 महिने चालणार मोबाईल? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Viral News On 20 Rupees Recharge : सोशल मोडियावर अनेक मेसेज व्हायरल होत असतात. त्यातील काही खरे असतात काही फसवणूक करणारे असतात. सध्या अशाच एक मेसेज व्हायरल होतोय. तो मेसेज आहे रिचार्जचा.

Sandeep Chavan

तुम्ही मोबाईल वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे...कारण, असा एक दावा करण्यात आलाय की 20 रुपयांत 4 महिने मोबाईल चालणार? खरंच 20 रुपयांत 4 महिने रिचार्ज चालणार का? काय आहे या दाव्यामागचं सत्य.? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

मोबाईलमध्ये तुम्ही रिचार्ज करत असाल तर तुम्हाला फक्त 20 रुपयांत 4 महिने व्हॅलिडिटी मिळणार आहे. हे आम्ही म्हणत नाहीये तर तसा दावा करण्यात आलाय.कारण, आता सगळेच प्लान महाग आहेत.त्यात हा दावा केल्यानं खरंच रिचार्ज प्लान एवढे स्वस्त झालेयत का? याची पडताळणी करणं गरजेचं आहे. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

व्हायरल मेसेज

Jio, Airtel आणि Vi च्या युजर्सला मोठा दिलासा.आता 20 रुपयांत तुमचं सिमकार्ड 4 महिने अॅक्टिव्ह राहणार. तुमच्या नंबरवर 90 दिवसांपर्यंत रिचार्ज केलं नसेल आणि मोबाईलमध्ये 20 रुपयांचं रिचार्ज शिल्लक असेल, तर कंपनी ते 20 रुपये कापून 30 दिवसांची अतिरिक्त वैधता देईल. हा मेसेज व्हायरल होत असल्याने अनेकांना आश्चर्य वाटतंय. कारण, एका महिन्याचं रिचार्ज करायचं असेल तर दीडशे पेक्षा जास्त रुपयांचं रिचार्ज करावं लागतं.

तसंच दिवसाचं इंटरनेटसाठी रिचार्ज करायचं तर 26 रुपयांपासून सुरू आहे...मात्र, खरंच आता ट्रायने नवीन नियम केलाय का? 20 रुपयांत 4 महिन्यांची व्हॅलिडिटी मिळणार आहे का...? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे.कारण, लाखो लोक मोबाईल वापरतात. त्यामुळे असं रिचार्ज असेल तर अनेकांना फायदा होईल.म्हणूनच आमच्या टीमने याची पडताळणी सुरू केली. याबाबत अधिक माहिती मोबाईल कंपन्यांकडून मिळू शकते. त्यामुळे आमच्या टीमने माहिती मिळवली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

व्हायरल सत्य/साम इन्व्हिस्टिगेशन

20 रुपयांत 4 महिने मोबाईल चालणार हा दावा खोटा

ट्रायने असा कोणताही नवीन नियम लागू केलेला नाही

लोकांची दिशाभूल करण्यासाठी पोस्ट व्हायरल

रिचार्ज प्लान आधीपेक्षा आता थोडे स्वस्त झालेत

टॉकटाईम रिचार्ज 10 रुपयांपासून मिळतं

मात्र, 20 रुपयांत 4 महिन्यांची म्हणजेच 120 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल असा जो दावा करण्यात आलाय तो खोटा आहे...त्यामुळे आमच्या पडताळणीत हा दावा असत्य ठरलाय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: मुंबईच्या २४ वर्षीय महिलेवर दुबईत सामूहिक बलात्कार; ५ सहकाऱ्यांच्या वासनेची बळी पडली

Maharashtra Politics: फडणवीस करणार मंत्रिमंडळाची साफसफाई, मंत्रिमंडळात फेरबदल, 8 विकेट पडणार?

Maharashtra Politics: यापुढे माझ्या अध्यक्षतेखाली बैठका घ्या! राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यावर शिरसाट संतापले

पालकांनो मुलांना सांभाळा,12 व्या मजल्यावरून पडून चिमुकलीचा मृत्यू

Fatty Liver In Women's: फॅटी लिव्हर असल्यास महिलांमध्ये दिसतात 'अशी' लक्षणे

SCROLL FOR NEXT