Krushi Mitra Yojana google
बिझनेस

Krushi Mitra Yojana : महाराष्ट्र सरकारची नवी योजना, गावातच काम करा अन् मिळवा १८ हजारांचे मानधन, पात्रता काय? वाचा

Agriculture News : महाराष्ट्र सरकारची कृषी मित्र योजना गावातील तरुणांसाठी मोठी संधी आहे. या योजनेत एकूण १८,००० रुपये मानधन मिळणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

सध्याची महागाई वाढत चालली आहे. शहराकडचा खर्च काय तर आता गावाकडे राहणाऱ्या माणसाचाही खर्च वाढत चालला आहे. गावाकडचे लोक हे शेती करतात. त्यातून मिळणाऱ्या पैशातून ते घर चालवतात. पण काही तरुणांना गावाकडे जास्त विकास नसल्याकारणाने बेरोजगार राहावं लागतं. याचाच विचार करुन कृषी विभागाने प्रत्येक गावात 'कृषी मित्र' योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतकऱ्यांसाठी नवी योजना

शेतकऱ्यांना शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता यासाठी आता थेट कृषी विभाग एक महत्वाची योजना राबवत आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध होणार आहे. ही माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. शेतकरी नक्कीच यांच्या निर्णयामुळे खुश असतील, अशी आशा आहे. तसेच ही योजना गावातल्या प्रत्येकाकडे पोहोचेल असंही त्यांनी सांगितलं.

योजनेत मिळणारे मानधन

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळावी म्हणून पहिल्या टप्प्यात ११,५८७ पर्यवेक्षकांची नियुक्ती केली जाईल. ही प्रक्रिया जिल्हास्तरावर राबवली जाईल. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना वर्षाला १८,००० रुपयांचं मानधन देण्यात येणार आहे. हे मानधन दर ३ महिन्यांना दिलं जाईल. सरकारचा उद्देश हा १ जूनपासून ही योजना सुरु करण्याचा आहे.

पात्रता आणि महिलांना संधी

कृषी मित्र योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी पुढील प्रमाणे आहेत:

१. शेतकऱ्याचे वय हे ४० वर्षांपेक्षा कमी असावे.

२. किमान माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण असावे.

३. संवाद कौशल्य चांगले असावे.

४. समाजकार्याची आवड आणि सोशल मीडियाचा वापर करता यावा.

५. कृषी मित्र योजनेत ३० टक्के महिलांना प्राधान्य दिले जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT