Microsoft Lays Off : 
बिझनेस

मायक्रोसॉफ्टनं 4800 कर्मचाऱ्यांना काढलं; AI वरील खर्चाच्या नावाखाली नोकरकपात

Microsoft Lays Off : तंत्रज्ञान जगतातील बलाढ्य कंपनी मायक्रोसॉफ्टनं आपल्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिलाय. कंपनीनं तब्बल 4 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची कपात केलीये. मात्र, आयटी क्षेत्रातील हजारो कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमावण्याची वेळ का येतेय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रोहित कदम, साम प्रतिनिधी

जगातील दिग्गज तंत्रज्ञान कंपनी मायक्रोसॉफ्टनं यंदाच्या वर्षात दुसरी नोकरकपात केलीये. मायक्रोसॉफ्ट कंपनीनं आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 2.1 टक्के म्हणजेच तब्बल 4 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकरदार वर्गावर भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मायक्रोसॉफ्टनं घेतलेल्या नोकरकपातीमागचं नेमकं कारण काय? ते पाहा.

मायक्रोसॉफ्टमध्ये नोकर कपात

  • मायक्रोसॉफ्ट कंपनी सुमारे 4,800 ते 5,500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

  • नवीन आर्थिक वर्षाच्या नियोजनानुसार कंपनी 2.5% कर्मचारी कपात करणार

  • सेल्स, कन्सल्टिंग आणि एक्सबॉक्स गेमिंग विभागातील कर्मचाऱ्यांवर थेट परिणाम होणार

  • AI तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी निर्णय

  • 2026च्या पहिल्या 6 महिन्यांत मायक्रोसॉफ्टच्या शेअर्समध्ये तब्बल 23% ची घसरण

AI तंत्रज्ञानावरील वाढता खर्च आणि व्यवसायात कार्यक्षमता आणण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलल्याचं सूत्रांनी म्हटलंय. इतकंच नव्हे तर व्यावसायिक गणिते चुकल्यामुळे कंपनीला एक्सबॉक्सच्या पुनर्रचनेचा निर्णय घ्यावा लागल्याचं गेमिंग विभागाचं म्हणणं आहे. एकूणच, AI आणि अन्य कारणांमुळे यंदा वर्षाच्या सुरूवातीपासूनच जगभरातील अनेक तंत्रज्ञान कंपन्यांनी नोकर कपातीचं धोरण राबवण्यास सुरूवात केलीये. त्यामुळे जगभरातील आयटी क्षेत्रातील नोकरदारवर्गावर नोकर कपातीची टांगती तलवार कायम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT