Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! आई-वडील आर्मी ऑफिसर, लेकीने पहिल्याच प्रयत्नात केली UPSC क्रॅक; २२ व्या वर्षी झाली IAS; चंद्रज्योती सिंह यांचा प्रवास

Success Story of IAS Chandrajyoti Singh: आयएएस चंद्रज्योती सिंह यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांचे आईवडील रिटायर्ड आर्मी ऑफिसर आहेत.

Siddhi Hande

प्रशासकीय सेवेत अधिकारी म्हणून काम करायचे अनेकांचे स्वप्न असते. प्रशासकीय सेवेत काम करायचे म्हटल्यावर स्पर्धा परीक्षा द्यावी लागते. स्पर्धा परीक्षा पास केल्यावरच तुम्ही आयपीएस, आयएएस अधिकारी होऊ शकता.यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. या परीक्षेत यश मिळवण्यासाठी दिवसरात्र एक करुन मेहनत करावी लागते. अशीच मेहनत चंद्रज्योती सिंग यांनी केली आहे. यूपीएससी परीक्षेत पहिल्या प्रयत्नात खूप कमी जणांना यश मिळतं. परंतु आयएएस चंद्रज्योती (IAS Chandrajyoti Singh) यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक करुन सर्वांसमोर नवा आदर्श ठेवला आहे.

पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी क्रॅक (IAS Chandrajyoti Singh Crack UPSC In First Attempt)

आयएएस चंद्रज्योती यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांनी वयाच्या २२ व्या वर्षी हे यश मिळवलं आहे. सर्वात तरुण आयएएस अधिकाऱ्यांपैकी चंद्रज्योती एक आहेत. चंद्रज्योती सिंग या वयाच्या २२ व्या वर्षीच आयएएस अधिकारी झाल्या.

आई-वडील आर्मी ऑफिसर

आयएएस चंद्रज्योती यांचे वडील दलबारा सिंह हे रिटायर्ड कर्नल आहेत. तर आई लेफ्टनंट कर्नल मीना सिंह या रिटायर्ड आर्मी रेडियोलॉजिस्ट आहेत.त्यांनीच आपल्या मुलीला प्रोत्साहन दिले. त्यानंतर त्यांनी मोठ्या जिद्दीने यूपीएससी परीक्षा दिली. आपल्या आईवडिलांचे नाव आयएएस चंद्रज्योती यांनी मोठे केले आहे.

अभ्यासात पहिल्यापासूनच हुशार

आयएएस चंद्रज्योती सिंह या लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होत्या. त्यांनी जालंधर येथील एपीजे स्कूलमधून १०वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर बारावीला चंदीगढच्या भवन विद्यालयातून ९५.४ टक्के गुण मिळवले. त्यांनी दिल्ली येथील सेंट स्टीफंस कॉलेजमधून हिस्ट्रीमध्ये ऑनर्स डिग्री प्राप्त केले. याचसोबत त्यांनी पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर्स डिग्री प्राप्त केली.

स्टडी प्लान

ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर चंद्रज्योती यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्यानुसार त्यांनी स्टडी प्लानदेखील बनवला. त्यांनी करंट अफेयर्स या विषयावर जास्त लक्ष दिले. दिवसाला त्या ६-८ तास अभ्यास करायच्या. त्यांच्या या मेहनतीला यश मिळाले आणि २०१९ मध्ये त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

SCROLL FOR NEXT