Maruti Swift Epic Edition carwale
बिझनेस

Maruti Swift Epic Edition: नवीन अपडेटसह बाजारात येते स्विफ्ट; दिल खूश करतील कारचे फीचर्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मारुती सुझुकीने नुकत्याच लॉन्च झालेल्या २०२४च्या स्विफ्टचे एपिक एडिशन लॉन्च केले आहे. हे नव मॉडेल स्विफ्ट LXi (बेस मॉडल) वेरिएंटवर बेस्ड आहे. हे बेसिक वेरिएंटच्या तुलनेत या नव्या एडिशन मॉडलमध्ये ऍक्सेसरी पॅक देण्यात आले आहे. याचा अर्थ असा की, आता तुम्ही थोडे जास्तीचे पैसे देऊन अतिरिक्त ॲक्सेसरीजसह स्विफ्टचे बेस मॉडेल खरेदी करू शकता.

नवीन स्विफ्ट कारमध्ये रिमोट लॉकिंग, सेंट्रल लॉकिंग, एलईडी टेललाइट्स, सर्व दरवाजांवर पॉवर विंडो, प्रोजेक्टर हेडलाइट्स, मागील डिफॉगर, हिल असिस्ट आणि ६ एअरबॅग्ज देण्यात आल्यात.या स्विफ्ट एपिक एडिशनमध्ये जवळपास २६ नवीन ॲक्सेसरीज देण्यात आल्या आहेत.

Maruti Swift Epic Edition चे फीचर्स

एपिक एडिशनमध्ये एलईडी फॉग लॅम्प, पियानो ग्लॉस ब्लॅक ग्रिल, डॅशबोर्डवरील OEM स्विचेस, कारच्या छतावरील पट्ट्या, पायोनियरची 7.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, त्यासोबत एकूण 4 स्पीकर देण्यात आले आहेत. दोन्ही स्पीकर तगड्या कंपनीचे आहेत, यातील दोन पायोनियर आणि दोन जेबील कंपनीचे आहेत. नवीन स्विफ्ट आता 6 एअरबॅग्ज, 5 थ्री-पॉइंट सीटबेल्ट, सीटबेल्ट रिमाइंडर, यासारख्या सुरक्षा फीचर्ससह येत आहे. कारच्या आतील भागात ड्युअल टोन लेदर सीट कव्हर, लेदर कव्हर स्टिअरिंग देण्यात आलीय.

Maruti Swift चं इंजिन

मारुती सुझुकी स्विफ्टमध्ये नवीन 1.2 लिटर, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे 82PS ची पॉवर आणि 112Nm टॉर्क जनरेट करते. ही कार 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांसह येते. या कारचे मॅन्युअल मॉडेल 24.8 किमी प्रति लिटरचे मायलेज देते आणि स्वयंचलित मॉडेल 25.75 किमी प्रति लिटरचे मायलेज देते. भारतीय बाजारपेठेत Hyundai Grand iTen, Hyundai Exter आणि Tata Panch सारख्या मायक्रो SUV आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: नाशिकमधील भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर

BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळणार १४२००० पगार; असा करा अर्ज

Salman Khan News: 'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट हाल...', सलमान खानला पुन्हा धमकी; ५ कोटींची मागणी

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT