Share Market Today Saam Tv
बिझनेस

Share Market Today : शेअर बाजारात वारं फिरलं, सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी घौडदौड; कोणते शेअर्स ठरले टॉप गेनर्स?

Share Market Today in Marathi : आज शेअर बाजारात वारं फिरलं आहे. आज सोमवारी सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी घौडदौड पाहायला मिळत आहे. आज कोणते शेअर्स ठरले टॉप गेनर्स, जाणून घ्या.

Vishal Gangurde

शेअर बाजारात गेल्या ९ दिवसांपासून पडझड पाहायला मिळत होती. त्यानंतर आज बाजारात रिकव्हरी पाहायला मिळत आहे. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये उसळी पाहायला मिळाली. सेन्सेक्सचा निचांकी स्तर ७५,२९४ अंकावरून ७६,०१८ वर पोहोचला.

आता सेन्सेक्समध्ये ७६ अंकांनी उसळी पाहायला मिळाली. निफ्टी घसरणीनंतर २० अंकांनी उसळी घेऊन २२,९५० वर पोहोचला. इंडसइंड बँक, पॉवर ग्रीड, श्रीराम फायनान्स, अदानी एंटरप्राइजेजचे निफ्टी टॉप गेनर्सच्या लिस्टमध्ये सामील आहेत.

शेअर बाजारात दुपारी १२.१५ वाजेपर्यंत सेन्सेक्समध्ये ३४० अंकांनी घसरण पाहायला मिळाली होती. सेन्सेक्सध्ये महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअरमध्ये ४.३९ अंकांनी घसरण पाहायला मिळाली. तर बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक, अल्ट्राटेक सीमेंट, पॉवर ग्रिड, एशियन पेंट्स, नेस्ले इंडिया, झोमॅटो , टाटा मोटर्स, रिलायन्समध्ये उसळी पाहायला मिळाली.

आज शेअर बाजारात सकाळी १०.३० वाजता निफ्टी फार्मा आणि हेल्थ केअर क्षेत्र सोडून सर्व क्षेत्रातील इंडेक्स लाल निशाण्यावर ट्रेड करत होते. निफ्टी आयटी, मेटल, पीएसू बँक, रियल्टी, ऑटो आणि आयटी टेलिकॉम इंडेक्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. बँक निफ्टी देखील एका टक्क्यांनी घसरला.

निफ्टी टॉप लूजर्सच्या यादीत महिंद्रा अँड महिंद्रामध्ये ४.२९ टक्क्यांनी घसरला. एचडीएफसी लाईफमध्ये १.३१ टक्के, हीरो मोटोकॉर्प १.२३ टक्के, बीईएल १.१४ टक्के, टाटा स्टील १.०९ टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली.

आज शेअर बाजारात सुरुवातीला सकाळी सेन्सेक्स ५२० अंकांनी घसरण पाहायला मिळली. त्यामुळे सेन्सेक्स ७५४१८ वर पोहोचला. निफ्टी १६८ अंकांनी घसरून २२,७६० वर पोहोचला. बीएसईचा बेंचमार्क इंडेक्स सेन्सेक्स हा सकाळी ९.१५ च्या सुमारास २९७ अंकांनी घसरून ७५६४१ वर पोहोचला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bacchu Kadu: आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर मस्त ऐश करत आहेत; सुट्ट्या काढून पळाले सगळे – बच्चू कडू संतापले|VIDEO

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची श्री धन्वंतरी रूपात अलंकारिक पूजा

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

SCROLL FOR NEXT