Mark Zuckerberg Vs Elon Musk Saam Tv
बिझनेस

Mark Zuckerberg: इलॉन मास्कला मार्क झुकेरबर्गने सोडलं मागे, बनला जगातील तिसरा सर्वात श्रीमंत व्यक्ती; संपत्तीत विक्रमी वाढ

Mark Zuckerberg Net Worth: जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा मालक मार्क झुकरबर्गच्या संपत्तीत विक्रमी वाढ झाली आहे. इलॉन मस्क याला मागे टाकून तो जगातील तिसरा श्रीमंत व्यक्ती बनला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mark Zuckerberg Net Worth:

जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा मालक मार्क झुकरबर्गच्या संपत्तीत विक्रमी वाढ झाली आहे. इलॉन मस्क याला मागे टाकून तो जगातील तिसरा श्रीमंत व्यक्ती बनला आहे. नोव्हेंबर 2020 नंतर पहिल्यांदा मार्क झुकरबर्गने इलॉन मस्कला मागे टाकले आहे. मार्क झुकेरबर्गने शुक्रवारी हे यश मिळवलं आहे.

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, मार्क झुकरबर्गच्या संपत्तीत शुक्रवारी 5.65 अब्ज डॉलरची वाढ झाली आणि आता त्याची एकूण संपत्ती 187 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. मार्क झुकरबर्गच्या संपत्तीत यावर्षी 58.9 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. शुक्रवारी त्याच्या संपत्तीत झालेली ही वाढ फेसबुकच्या मूळ कंपनी मेटाच्या शेअर्समध्ये झालेल्या प्रचंड वाढीमुळे झाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इलॉन मस्कचे झाले इतके नुकसान

शुक्रवारी मेटा शेअर्सने विक्रमी उच्चांक गाठला. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, झुकरबर्गची संपत्ती 187 अब्ज डॉलर्स आहे. तर इलॉन मस्क याची एकूण संपत्ती 181 अब्ज डॉलर्सवर पोहोचली असून तो जगातील चौथ्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती आहेत. मस्क याला यावर्षी 48.4 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. तर शुक्रवारीच त्यांच्या संपत्तीत 4.52 अब्ज डॉलरची घट झाली. (Latest Marathi News)

दरम्यान, इलॉन मस्क हा मार्चपर्यंत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होता. मात्र आता तो चौथ्या स्थानावर घसरला आहे. या वर्षात सर्वाधिक संपत्ती गमावणारी व्यक्ती इलॉन मस्क आहे, तर मार्क झुकरबर्ग या वर्षी सर्वाधिक संपत्ती कमावणारा अब्जाधीश ठरला आहे.

झुकरबर्गने 16 नोव्हेंबर 2020 नंतर पहिल्यांदा इलॉन मस्कला मागे टाकले आहे. त्यावेळी त्यांची एकूण संपत्ती 105.6 अब्ज डॉलर होती. तर इलॉन मस्कची एकूण संपत्ती 102.1 अब्ज डॉलर होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Accident: नामकरण सोहळ्यावरून परतताना काळाचा घाला, समृद्धी महामार्गावर भरधाव कार उलटली, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

चाँद नवाबनंतर आणखी एक पाकिस्तानी पत्रकार चर्चेत! समुद्राच्या खोलीचं रिपोर्टिंग करताना थेट समुद्रात मारली उडी

Dragan Fruit Farming : माळरानावर फुलवली ड्रॅगन फ्रुटची शेती; येवल्याच्या दुष्काळग्रस्त भागात यशस्वी प्रयोग

Kitchen Hacks: काकडी कापण्यापूर्वी ती घासली का जाते? 'या' कारणांमुळे तुम्हीही कराल हा प्रयत्न

SCROLL FOR NEXT