बाबा वेंगा यांनी २०२६ वर्षांत आर्थिक संकट येण्याची भविष्यवाणी केली आहे.
आर्थिक संकटात सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून मागणी वाढण्याची शक्यता असते.
सोन्याचा भाव दीड ते दोन लाख रुपये तोळ्यापर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जातोय.
गेल्या काही दिवसांत सोन्याची किमतीत चढउतार पाहायला मिळत आहे. १ लाख ३३ हजारांवर पोहोचलेला एक तोळा सोन्याचा भाव घसरून २४ हजार ९७० रुपयांवर पोहोचलाय. काही दिवसांपूर्वी सोन्याचा भाव १ लाख २० हजार रुपये होता. बाबा वेंगा यांनीही याच सोन्याच्या किंमतीवर अप्रत्यक्षरित्या मोठी भविष्यवाणी केली आहे.
गेल्या महिन्यांपासून सोन्याच्या किंमतीत चढउतार पाहायला मिळत आहे. एक ग्रॅम सोन्याचा भाव १३ नोव्हेंबर रोजी १२.३८२ रुपये इतका होता. तर दुसऱ्या दिवशी ही किंमत १२.७०४ रुपये इतकी झाली. त्यानंतरही बाजारात सोन्याची किंमत ही १२.५०८ पर्यंत स्थिर राहिली. तर २०२६ वर्षात सोनं महागणार असल्याची भविष्यवाणी बाबा वेंगा यांनी केली आहे.
न्यूज १८ च्या वृत्तानुसार, बाबा वेंगा यांनी थेट सोन्याच्या किंमतीवर भाष्य केलं नाही. परंतु सोन्याच्या किंमतीबाबत अप्रत्यक्षरित्या मोठं भाष्य केलंय. त्यांनी २०२६ साली आर्थिक संकट येणार असल्याची भविष्यवाणी केली आहे. त्यामुळे याकाळात अनेक जण सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहतात. बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, पुढच्या वर्षी जगावर आर्थिक संकट आल्यास सोन्याचा भाव तोळ्यामागे दीड ते दोन लाख रुपये इतका होऊ शकतो. त्यामुळे सोन्याचा भाव उच्चांकी पातळीवर पोहोचू शकतो.
बाबा वेंगा यांच्या काही भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत. अमेरिकेच्या ट्विन टॉवरवर दहशतवादी हल्ला, राजकुमारी डायना, म्यानमारमधील भूकंपाबाबत केलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे. त्यांनी याबाबत थेट भविष्यवाणी केली नव्हती. तर अप्रत्यक्षरित्या इशारा दिला होता. आता बाबा वेंगा यांची सोन्याच्या किंमतीबाबत केलेली भविष्यवाणी व्हायरल होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.