Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana : 40 लाख लाडक्या अपात्र होणार? सखोल पडताळणीनंतर अपात्रतेची संख्या वाढणार; पाहा स्पेशल रिपोर्ट

Ladki Bahin Yojana News : लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्यांच्या अर्जांची यंत्रणेकडून पडताळणी होत आहे. सुमारे सव्वा दोन कोटी लाभार्थ्यांमधून 40 लाख अर्ज अपात्र ठरण्याची शक्यता आहे. नेमक्या कोणक्या लाडक्या बहिणींवर गंडांतर येणार आहे त्यावरचा हा विशेष रिपोर्ट

Girish Nikam

Ladki Bahin Yojana Maharashtra : विधानसभा निवडणूक निकालानंतर लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जांची काटेकोरपणे पडताळणी होत आहे. साधारण २ कोटी ३१ लाख ८६० महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या. मात्र आता महायुती सत्तेवर आल्यानंतर अपात्र बहिणींना योजनेतून वगळण्यास सुरुवात झाली आहे. कारण या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर आर्थिक भार पडत आहे.

एका पेक्षा जास्त सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या पाच लाख लाभार्थ्यांची संख्या कमी झाली होती. मात्र आता निकषांनुसार पडताळणी केल्यानंतर ही संख्या तब्बल 40 लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. कोणत्या निकषांमुळे लाडक्या अपात्र ठरल्यात ते पाहूया.

40 लाख लाडक्या अपात्र होणार?

संजय गांधी निराधार योजना - 2 लाख 30 हजार

65 वर्षांहून अधिक वय असलेल्या - 1 लाख 10 हजार

चार गाडी असलेल्या, नमोशक्ती योजना लाभार्थी आणि स्वेच्छेनं नाव मागे घेणाऱ्यांची संख्या - 1 लाख 60 हजार

फेब्रुवारीत छाननी प्रक्रियेनंतर अपात्र ठरलेल्या - 2 लाख

सरकारी कर्मचारी, दिव्यांगांमधून अपात्र ठरलेल्या - 2 लाख

लाडकींची संख्या घटल्यामुळे सरकारचे कोट्यवधी रुपये वाचले आहेत. कारण या योजनेमुळे इतर योजनांच्या निधींना कात्री लागली आहे. योजनेचा सर्वाधिक फायदा पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यातील महिलांनी घेतला आहे. सिंधुदुर्ग, गडचिरोलीतील लाभार्थ्याचं प्रमाण सर्वात कमी आहे. 30-39 वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे.

या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये विवाहित महिलांचं प्रमाण 83 टक्के आहे. विधवा महिलांचं प्रमाण 4.7 टक्के आहे. अविवाहित महिलांचं प्रमाण 11.8 टक्के आहे. लाभार्थ्यांमध्ये घटस्फोटीत, निराधार आणि सोडून दिलेल्या महिलांचे प्रमाण हे एकत्रितपणे 1 टक्क्यांपेक्षा कमी आहे.

निवडणुकीपूर्वी सरकारनं काटेकोर छाननी न करता योजनेचा लाभ दिला. आता अपात्र लाभार्थ्यांकडून आत्तापर्यंत दिलेले पैसे परत घेणार नसल्याची सरकारची भूमिका आहे. यापूर्वीच अर्जांची पडताळणी गांभीर्याने केली असती तर सरकारी तिजोरीतील कोट्यवधी रुपये वाचले असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT