maharashtra ladki bahin yojana 5 lakh women wont get installment Saam Tv News
बिझनेस

Ladki Bahin Yojana : तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाही? ही प्रक्रिया तात्काळ पूर्ण करा, अन्यथा...

Ladki Bahin Yojana KYC Remaning : लाडकी बहीण योजनेत फक्त नियमांमध्ये पात्र असणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेत तब्बल ५ लाख महिलांनी केवायसी केलेले नसल्याचं समोर आलं आहे.

Prashant Patil

मुंबई : लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जवळपास ५ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा दोन दिवसांपूर्वी वितरीत करण्यात आला आहे. आतापर्यंत २ कोटी ४७ लाख महिलांना या योजनेअंतर्गत मे महिन्याचे १५०० रुपये मिळाले आहेत.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या ही अडीच कोटींपेक्षा जास्त आहे. अजूनही अनेक महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा झाले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सुमारे ५ लाख महिलांना पैसे मिळाले नाहीत. यामागचं कारण आता समोर आलेलं आहे.

लाडकी बहीण योजनेत फक्त नियमांमध्ये पात्र असणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेत तब्बल ५ लाख महिलांनी केवायसी केलेली नसल्यामुळे ५ लाख बहिणींना त्यांचा हफ्ता मिळालेला नाही. अशा महिलांना सुरुवातीचे १२ हफ्ते मिळाले, पण बँकेत गेल्यानंतर त्यांना KYC करण्यास सांगितल्यामुळे त्यांचे हफ्ते थांबलेले आहेत. त्यामुळे त्यांना योजनेचा मे महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. यामध्ये बँक खाते आणि आधार कार्ड लिंक असणाऱ्या महिलांनाच लाभ मिळणार आहे. जर तुमचे बँक खाते आणि आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाहीये.

५ लाख महिलांना केवायसी केले नाही म्हणून योजनेचा लाभ मिळाला नाही. परंतु याचसोबत अनेक महिला आहेत ज्यांनी नियमाबाहेर जाऊन लाभ घेतला आहे. या लाभार्थ्यांचेही अर्ज रद्द करण्यात आले आहेत. यामध्ये अडीच हजार महिला या सरकारी कर्मचारी असल्याचं समोर आलं आहे. तर अनेक महिलांना इतर योजनांचाही लाभ घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बोगस बियाण्यानंतर बोगस खतांचा साठा जप्त; राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

पुरातून हत्तीने वाचवलं वाघाला? पाठीवर बसवून हत्तीने केली सुटका?

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

राममंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात? पोलिसांनी 30 बँक खाती गोठवली?

तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध? महाराष्ट्रात भेसळमाफियांचा उच्छाद, भेसळमाफियांना होणार थेट मृत्यूदंडाची शिक्षा?

SCROLL FOR NEXT