Maharashtra property registration revenue 2026 latest data :  Saam TV
बिझनेस

Property Registration : महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीत पैशांचा पाऊस! अवघ्या ५ महिन्यांत कमावले हजारो कोटी

Maharashtra property registration : महाराष्ट्रात घर आणि जमीन खरेदी-विक्रीला मोठी तेजी आली आहे. एप्रिल ते ऑगस्ट २०२६ या पाच महिन्यांत २१.२३ लाख मालमत्ता दस्तऐवजांची नोंदणी झाली असून सरकारच्या तिजोरीत २६,६३७.७३ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला.

Namdeo Kumbhar

Maharashtra property registration revenue 2026 latest data : घर आणि जमीन खरेदी-विक्रीमध्ये महाराष्ट्रात सध्या मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या ५ महिन्यांत महसुलात तब्बल १६ टक्क्यांची वाढ झाली आहे. एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत राज्यात मालमत्ता नोंदणी (Property Registrations) आणि त्यातून मिळणाऱ्या महसुलात (Revenue) मोठी वाढ झाली आहे. राज्यातील या वाढत्या खरेदी-विक्रीमुळे राज्य सरकारच्या तिजोरीत हजारो कोटींचा महसूल जमा झाला असून, मंदीच्या चर्चांनंतरही महाराष्ट्रातील रिअल इस्टेट मार्केट तुफान तेजीत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षाच्या (२०२५) याच कालावधीच्या तुलनेत यंदा मालमत्ता नोंदणीत तब्बल १२ टक्क्यांची वाढ झाली आहे. राज्य सरकारच्या महसुलात १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया आणि सातत्याने वाढणारी घरांची मागणी यामुळे मुंबई, पुणे आणि ठाण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये घर खरेदीदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.

५ महिन्यांत २६,६३७ कोटींचा महसूल

गणेशोत्सव आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील स्थावर मालमत्ता (रिअल इस्टेट) क्षेत्रात मोठी तेजी येण्याची शक्यता आहे. राज्य नोंदणी विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत राज्यातील मालमत्ता नोंदणीत मागील वर्षाच्या तुलनेत १२.४ टक्क्यांची नोंदणीकृत वाढ झाली आहे. यामुळे राज्य सरकारच्या महसूल संकलनातही तब्बल १६ टक्क्यांची मोठी वाढ झाली असून सरकारी तिजोरीत २६,६३७.७३ कोटी रुपये जमा झाले आहेत. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांत ११ सप्टेंबरपर्यंत १.६६ लाख दस्तऐवजांची नोंदणी झाली असून त्यामधून २,००२.६५ कोटी रुपयांचा महसूल राज्याच्या तिजोरीत जमा झाला.

मालमत्ता नोंदणीचा नवा विक्रम

राज्यात एप्रिल ते ऑगस्ट २०२६ या अवघ्या पाच महिन्यांच्या कालावधीत तब्बल २१,२३,८२१ (२१.२४ लाख) मालमत्ता दस्तऐवजांची नोंदणी झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत १८,९०,१६७ दस्तऐवजांची नोंदणी झाली होती. दोन वर्षांपूर्वी (२०२४-२५) हा आकडा १८,०२,०३५ इतका होता. या आकडेवारीवरून यंदाची नोंदणी ही दोन वर्षांपूर्वीच्या तुलनेत १७.९ टक्क्यांनी जास्त असल्याचे स्पष्ट होते.

मालमत्तांच्या खरेदी-विक्रीत झालेल्या वाढीमुळे राज्य सरकारच्या तिजोरीत मोठा महसूल जमा झाला आहे. यंदाचा महसूल २६,६३७.७३ कोटी रुपये इतका झाला आहे. तर गेल्या वर्षीचा महसूल २२,९९६.०४ कोटी रुपये इतका झाला. दोन वर्षांपूर्वी २२,२३५.६५ कोटी रुपये इतका होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा पनवेल बाजार समितीला फटका; ग्राहकांनी फिरवली पाठ

Weight Loss : सकाळच्या नाश्त्यात चुकूनही खाऊ नका 'हे' ५ पदार्थ, झपाट्याने वाढेल वजन अन्...

समुद्रात भयंकर दुर्घटना! २४० प्रवाशांनी भरलेले जहाजच गायब; बचावकार्य सुरू

Gold Rate Today: खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण; चांदीही झाली स्वस्त, वाचा 24, 22 आणि १८ कॅरटचे आठवडाभराचे दर

Konkan Travel : गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या नागरिकांचे हाल, रेल्वे १२ तास उशिराने, महामार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा

SCROLL FOR NEXT