LPG Price Today google
बिझनेस

LPG Price Today : गॅस सिलिंडर स्वस्त झाला की महाग? एका क्लिकवर पाहा आजचा भाव

Gas Cylinder Rate: ५ जुलै २०२६ रोजी एलपीजी सिलेंडरच्या किंमतींमध्ये कोणताही बदल झाला नाही. मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता या ठिकाणी घरगुती दर स्थिर असून व्यावसायिक सिलेंडरवरील कपात कायम आहे.

Sakshi Sunil Jadhav

एलपीजी गॅस सिलेंडर बुक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ५ जुलै २०२६ रोजी तेल विपणन कंपन्यांनी घरगुती तसेच व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही नवीन बदल केलेला नाही. त्यामुळे १ जुलैपासून लागू करण्यात आलेले दरच आजही कायम आहेत. दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किंमतींचा आढावा घेतला जातो आणि त्यानुसार नवे दर जाहीर केले जातात. पण यावेळी दर स्थिर ठेवण्यात आल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

१४.२ किलोच्या घरगुती LPG सिलेंडरची किंमत कालप्रमाणेच स्थिर आहे. मुंबईमध्ये सिलेंडरची किंमत ९४१.५० रुपये, दिल्लीमध्ये ९४२ रुपये, नोएडामध्ये ९३९.५० रुपये, चेन्नईमध्ये ९५७.५० रुपये आणि कोलकातामध्ये ९६८ रुपये इतकी आहे. यामध्ये वाहतूक खर्च आणि इतर स्थानिक शुल्कांमुळे विविध शहरांमध्ये किंमतींमध्ये थोडाफार फरक दिसून येतो.

दरम्यान १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतींमध्ये १ जुलैपासून १८३.५० रुपयांची कपात करण्यात आली होती. या निर्णयामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाण्याच्या व्यवसायाशी संबंधित व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या दिल्लीमध्ये 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर 2,930 रुपयांना उपलब्ध आहे.

एलपीजी सिलिंडरच्या किंमती निश्चित करताना आंतरराष्ट्रीय बाजारातील एलपीजीचे दर, डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर,आयातीचा खर्च, वाहतूक खर्च तसेच केंद्र सरकारची धोरणे या विविध घटकांचा विचार केला जातो. या सर्व बाबींचा आढावा घेऊन तेल विपणन कंपन्या प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला नवीन दर जाहीर करतात.

तुमच्या शहरातील एलपीजी सिलिंडरची अचूक किंमत जाणून घ्यायची असल्यास इंडेन, भारत गॅस किंवा एचपी गॅसच्या अधिकृत वेबसाइट अथवा मोबाईल अॅपवर भेट देऊ शकता. तिथे तुम्हाला शहरानुसार योग्य दर नियमितपणे उपलब्ध करून दिले जातात. सध्या दरात कोणताही बदल नसल्यामुळे ग्राहकांचे लक्ष आता पुढील महिन्याच्या पहिल्या तारखेला जाहीर होणाऱ्या नवीन दरांकडे लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आंबोली घाटात वाहतूक कोंडी, दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा

Monsoon Health Care: पावसाळ्यात रोज सकाळी नाश्त्यासोबत दूध प्या मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Raigad : मुसळधार पावसाचा कहर! वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प; नागरिकांचे हाल

Aamir khan wedding : आमिर खान तिसऱ्यांदा चढला बोहल्यावर; गौरी स्प्रॅटसोबत बांधली लग्नगाठ, पहिला PHOTO आला समोर

Tricks To Protect Mobile : पावसाळ्यात मोबाईल भिजण्यापासून वाचवण्यासाठी फॉलो करा या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT