LPG Gas Cylinder Price Latest Price Marathi Saam TV
बिझनेस

LPG Gas Cylinder Price: ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट, गॅस सिलिंडरच्या किंमती घसरल्या

Gas Cylinder Price Latest News: महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महिन्याच्या सुरूवातीलाच गॅस सिलिंडरचे भाव कमी झाले आहेत.

Satish Daud

Gas Cylinder Price Latest News: गेल्या काही दिवसांपासून देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पेट्रोल-डिझेल, खाद्यतेल आणि टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे या महागाईत घर चालवायचं तरी कसं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

अशातच, महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महिन्याच्या सुरूवातीलाच गॅस सिलिंडरचे भाव कमी झाले आहेत. ऑगस्टच्या पहिल्या तारखेला देशातील सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजीच्या किमती जाहीर केल्या आहेत.

नवीन किमतीनुसार, व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर तब्बल १०० रुपयांची कमी करण्यात आले आहेत. तेल कंपन्यांच्या या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, तेल कंपन्यांनी केवळ व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत.

घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. घरगुती गॅस सिलिंडरचे दर जैसे थे आहेत. सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमती बदलतात. गेल्या महिन्यात व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत बदल झाला होता.

सिलिंडर किती रुपयांनी स्वस्त झाला?

१ ऑगस्ट रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत १०० रुपयांनी कपात केली आहे. या कपातीनंतर देशाची राजधानी दिल्लीत व्यावसायिक स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची किंमत १,६८० रुपयांवर गेली आहे. यापूर्वी, ४ जुलै २०२३ रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत किरकोळ रूपयांची वाढ करण्यात आली होती.

व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर किती?

कोलकातामध्ये, व्यावसायिक स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची किंमत १८९५.५० रुपयांवरून १८०२.५० रुपयांवर घसरली आहे. मुंबईत गेल्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडर १७३३.५० रुपयांना मिळत होता. आता त्यात घसण झाली असून सिलिंडरची किंमत १६४० रुपये इतकी झाली आहे. तर चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडर १८५२.५० रुपयांना मिळत आहेत.

घरगुती गॅस सिलिंडरचा दर किती?

एकीकडे गेल्या काही महिन्यांपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत सातत्याने बदल होत आहेत. त्याच वेळी, १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती बऱ्याच काळापासून स्थिर आहेत. या महिन्यातही घरगुती गॅसच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आला नाही. सरकारने १ मार्च २०२३ रोजी घरगुती गॅसच्या दरात ५० रुपयांची वाढ केली होती. तेव्हापासून दर स्थिर आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT