LPG गॅस सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी ही बातमी महत्त्वाची ठरणार आहे. सध्या गॅस बुकिंग आणि सबसिडीच्या नावाखाली ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढतोय. गॅस एजन्सी, तेल कंपन्या किंवा सरकारी अधिकारी असल्याचं सांगून सायबर भामटे ग्राहकांना जाळ्यात ओढतात. व्हॉट्सॲप आणि एसएमएसच्या माध्यमातून बनावट मेसेज पाठवून ग्राहकांची आर्थिक फसवणूक केली जाते. त्यामुळे गॅस ग्राहकांनी वेळीच सावध राहणं गरजेचं आहे.
सायबर भामटे ग्राहकांना फोन करून तुमची LPG सबसिडी बंद झाली आहे किंवा थांबवण्यात आली आहे, असं सांगतात. सबसिडी परत सुरू करण्यासाठी किंवा गॅस कनेक्शन बंद होऊ नये म्हणून तातडीने e-KYC पूर्ण करायला सांगितलं जातं.
यानंतर ग्राहकांच्या मोबाईलवर गॅस बुकिंग किंवा सबसिडी पडताळणीसाठी बनावट लिंक पाठवतात. या लिंकवर क्लिक करून वैयक्तिक माहिती भरायला भाग पाडलं जातं. काही वेळा ग्राहकांना बनावट APK फाइल डाउनलोड करण्यास सांगितलं जातं. त्यातून मोबाईलमधला गोपनीय डेटा चोरी केला जाऊ शकतो.
अनोळखी नंबरवरून गॅस सबसिडी बंद होण्याचे फोन किंवा मेसेज
तातडीने KYC अपडेट करा, अन्यथा गॅस कनेक्शन बंद होईल, अशी धमकी
गॅस बुकिंग किंवा सबसिडी तपासण्यासाठी संशयास्पद लिंक पाठवणे.
OTP, ATM PIN, CVV, UPI पासवर्ड किंवा कार्डची माहिती मागणे.
मोबाईलवर अनोळखी ॲप किंवा APK फाइल डाउनलोड करण्यास सांगणे. अशा प्रकारचे फोन किंवा मेसेज आल्यास घाबरून कोणतीही माहिती देऊ नका.
ग्राहकांनी कोणत्याही व्यक्तीसोबत OTP, PIN, CVV किंवा पासवर्ड शेअर करू नये. अनोळखी लिंकवर क्लिक करणे किंवा संशयास्पद फाइल डाउनलोड करणे टाळावे. गॅस बुकिंग आणि e-KYC संदर्भातील माहिती नेहमी अधिकृत LPG वितरकाकडून तपासून घ्यावी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.