LPG eKYC meta ai
बिझनेस

LPG eKYC : LPG ग्राहकांना दिलासा e-KYC ची तारीख वाढली! घरबसल्या फक्त काही मिनिटांत करा प्रोसेस

LPG e-KYC Deadline : LPG ग्राहकांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. ई-केवायसीची अंतिम मुदत २३ ऑगस्टपर्यंत वाढली आहे. अधिकृत अॅपच्या मदतीने घरबसल्या आधार आणि फेस Authentication वापरून ईकेवायसी पूर्ण करा.

Sakshi Sunil Jadhav

घरगुती LPG गॅस कनेक्शन असलेल्या ग्राहकांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. e-KYC पूर्ण करण्यासाठी देण्यात आलेली अंतिम मुदत आता १६ ऑगस्टवरून २३ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे ज्या ग्राहकांची अजूनही e-KYC झालेली नाही, त्यांना आता काही दिवस वाढवून दिले आहेत.

e-KYC करण्यासाठी मोठ्या संख्येने ग्राहक एकाच वेळी प्रयत्न करत असल्याने LPG कंपन्यांच्या अॅपवर तांत्रिक अडचणी, सर्व्हर डाउन आणि प्रोसेस मध्येच थांबवण्याच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. काही ठिकाणी गॅस एजन्सींमध्येही e-KYC करण्यासाठी ग्राहकांच्या लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. या अडचणी लक्षात घेऊन मुदत वाढवण्यात आली आहे.

२३ ऑगस्टपर्यंत e-KYC पूर्ण करा

ज्या ग्राहकांनी आधीच e-KYC प्रोसेस पूर्ण केली आहे. त्यांना पुन्हा प्रोसेस करण्याची गरज नाही. आपल्या e-KYC ची स्थिती संबंधित LPG कंपनीच्या अधिकृत अॅपवर किंवा गॅस एजन्सीकडून तपासता येईल.

महत्त्वाचं म्हणजे, मुदतीपर्यंत e-KYC न केल्याने गॅस कनेक्शन तात्काळ बंद किंवा रद्द होईलच असं नाही. मात्र सरकारी LPG सब्सिडीवर परिणाम होऊ शकतो आणि ग्राहकाला सिलेंडर विनासबसिडी घ्यावा लागू शकतो.

घरबसल्या e-KYC कशी कराल?

LPG ग्राहकांना घरबसल्या e-KYC करण्यासाठी संबंधित गॅस कंपनीचे अधिकृत मोबाइल अॅप वापरता येईल.

१. अधिकृत LPG अॅप डाउनलोड करून कनेक्शनशी संबंधित मोबाइल क्रमांकाने लॉगिन करा.

२. e-KYC किंवा आधार अपडेट पर्याय निवडा.

३. तुमचा १२ अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करा.

४.आधार आधारित Face Authentication प्रोसेस पूर्ण करा.

५. प्रोसेस यशस्वी झाल्यानंतर स्क्रीनवर KYC पूर्ण झाल्याचा मेसेज दिसेल. काही प्रकरणांमध्ये SMS च्या मदतीनेही माहिती मिळवू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ट्रकच्या मागे ‘Horn OK Please’ का लिहितात? कारण वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल!

Maharashtra News Live Update: कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गावांचे सांडपाणी गोदावरीत जाणार नाही- पंकजा मुंडे

Wardha Crime: विवाहबाह्य प्रेमसंबंधात अडथळा, महिलेने बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याला संपवलं; वर्धा हादरले

High BP - Diabetes : औषधी गुणांनी समृद्ध 'या' फळाचं पान रोज खा, मधुमेह अन् हाय बीपी कायम राहील नियंत्रणात

Sanjay Raut: धनुष्यबाण विकलं, हजारो कोटींचा व्यवहार; निवडणूक आयोगावर संजय राऊतांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT