LPG Price Today meta ai
बिझनेस

LPG Price Today: पुन्हा सिलेंडर स्वस्त झाला की ग्राहकांची निराशा? आजचे नवे रेट आले समोर

LPG Price August 2026: गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ३० ऑगस्टला LPG सिलेंडरच्या दरात बदल झालेला नाही.

Sakshi Sunil Jadhav

एलपीजी सिलेंडरच्या दराबद्दल ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. १ ऑगस्ट २०२६ रोजी ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी १९ किलोच्या कमर्शियल LPG सिलेंडरच्या किमतीत तब्बल २०९ रुपयांपर्यंत कपात केली होती. त्यानंतर आता ३० ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे सध्या ग्राहकांना ऑगस्टच्या सुरुवातीला लागू झालेले दरच द्यावे लागत आहेत.

सलग दोन महिन्यात कमर्शियल सिलेंडर स्वस्त

कमर्शियल LPG सिलेंडरच्या किमतीत सलग दुसऱ्या महिन्यात कपात करण्यात आली. जुलैमध्ये कंपन्यांनी १७९ पर्यंत दर कमी केले होते. त्यानंतर १ ऑगस्टला पुन्हा २०९ पर्यंत कपात झाली. मात्र, या दोन्ही महिन्यांत १४.२ किलोच्या घरगुती LPG सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

आजचे घरगुती LPG सिलेंडरचे दर

३० ऑगस्ट रोजी उपलब्ध माहितीनुसार, १४.२ किलोच्या घरगुती सिलेंडरचे दर शहरानुसार वेगवेगळे आहेत.

मुंबई - ९४१.५०

दिल्ली - ९५३ च्या आसपास

कोलकाता - ९६८

चेन्नई - ९५७.५०

नोएडा - ९३९.५०

भुवनेश्वर - ९६८

चंदीगड - ९५१.५०

हैदराबाद - ९९४

कमर्शियल सिलेंडरचे दर किती?

१९ किलोच्या कमर्शियल सिलेंडरचा दर कोलकात्यात २,८७२.५०, मुंबईत २,६९१.५०, चेन्नईत २,९०६ तर पटणामध्ये हा दर ३.०१८ इतका आहे. दरम्यान,LPG उत्पादन वाढवण्यासाठी सरकारने रिफायनरी कंपन्यांना लक्ष्य दिलं आहे. त्यामुळे आगामी काळात पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीनुसार LPG दरात बदल होतात का, याकडे लक्ष राहणार आहे. १ सप्टेंबरला होणाऱ्या मासिक दराच्या आढाव्यात घरगुती किंवा कमर्शियल सिलेंडरच्या किमती बदलतात का, हे महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जुन्या नोंदी, कागदपत्रांच्या अडचणींवर सरकारचा तोडगा; मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय

बळीराजाच्या डोळ्यांत अश्रू, मंत्र्यांना बदाम-काजू, दुष्काळाच्या बैठकीत नेते-अधिकाऱ्यांना मेजवानी

Maharashtra News Live Update: IIT मुंबईतील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर कॅम्पसमध्ये संतापाचं वातावरण

बळीराजा दुष्काळात होरपळला; पावसाची दडी, राज्यावर दुष्काळाचं सावट

Home Gardening : बाल्कनीपासून बेडरूमपर्यंत घरातील प्रत्येक कोपऱ्यात कोणती झाडे कुठे लावावीत? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT