LPG Gas Cylinder google
बिझनेस

LPG Gas Cylinder: कॉल करुन सिलेंडर बुक होत नाही? आत्ताच फॉलो करा या ४ स्टेप्स; बुकिंग करूनही न मिळाल्यास 'इथे' करा तक्रार

LPG Cylinder Complaint Number: देशभरात LPG सिलेंडर बुकिंगमध्ये अडचणी वाढल्या आहेत. फोनवर बुकिंग होत नसेल तर WhatsApp, SMS, मिस्ड कॉल, मोबाइल अॅप किंवा ऑनलाइन पोर्टलद्वारे सिलेंडर बुक करा आणि गरज असल्यास तक्रार नोंदवा.

Sakshi Sunil Jadhav

सध्या संपूर्ण देशात LPG गॅसचा तुटवडा जाणवत आहे. बऱ्याच जणांचे गॅस सिलेंडर बुकचं होत नाहीयेत. काहींचे बुक झालेले रद्द होत आहेत. अशा अनेक तक्रारींना अनेकांना सामोरं जावं लागतंयं. काहीच दिवसांपुर्वी गॅसच्या बाटल्याचे भाव ६० रुपयांनी वाढवण्यात आले होते. त्यानंतर अनेकांना या समस्यांना सामोरं जावं लागलेलं आहे. त्यातच अनेकांना फोन बुकींगच्या समस्या येत आहेत. पुढे आपण याच समस्येवर उपाय आणि नुकतेच बदलले गेलेले ४ नियम जाणून घेणार आहोत.

मुळात बरेच दिवस अनेकांचं फोन कॉलवरुन बुकींग होत नाहीये. त्यामुळे ग्राहक उन्हाच्या कडाक्यात गॅस एजन्सीच्या बाहेर लांबच्या लांब रांगा लावतायेत. पण आता तुम्हाला याची गरज लागणार नाही. तुम्ही घरबसल्या WhatsApp, मिस्ड कॉल, SMS तसेच मोबाईल अ‍ॅप किंवा ऑनलाइन पोर्टलच्या मदतीने सिलेंडर बुक करु शकता आणि बुकींग होत नसल्यास तक्रारही करु शकता. माहिती जाणून घेण्यासाठी बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा.

एसएमएस बुकींग स्टेप्स

तुम्ही आता थोड्या डिजीटल पद्धतीने बुकींग करु शकता. त्यासाठी तुम्ही सगळ्यात आधी तुमचं WhatsApp ओपन करा. Indane कंपनीच्या ग्राहकांनी त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरुन म्हणजेच 7588888824 या क्रमांकावर REFILL असा मेसेज करा. याने तुमचा सिलेंडर बुक करता येईल. तुम्ही जर HP Gasचे ग्राहक असाल तर, 9222201122 या फोननंबरवर Hi पाठवून किंवा Book असा मेसेज करु शकता. तसेच जर तुम्ही भारत गॅसचे ग्राहक असाल तर 1800224344 या नंबरवर Hi किंवा Book असा मेसेज करून सिलेंडर बुक करू शकतात.

मिस्ड कॉल बुकींग स्टेप्स

ग्राहकांना मिस्ड कॉल देऊन सिलेंडर बुक करता येतो. तुम्ही त्याच नंबरवर कॉल लावून ही बुकींग सोप्या पद्धीने करु शकता. तसेच त्यावर व्हाट्सअॅप शिवाय मेसेज अॅपवरुन सेम मेसेज करुन बाटला बुक करु शकता. तसेच यामध्ये डिजीटल मोबाइल अॅप्सचा वापर करुन सिलेंडर बुक करु शकता. त्यासाठी गॅसच्या कंपनीचं अॅप डाऊनलोड करा. किंवा केंद्र सरकारचं UMANG अॅप सुद्धा घेऊ शकता. तसेच Paytm, PhonePe आणि Amazon Pay यांसारख्या पेमेंट अ‍ॅप्सवरूनही एलपीजी सिलेंडर बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

तक्रार करण्याची पद्धत

तुम्हाला जर बाटला बुक करुन वेळेवर डिलिव्हरी मिळत नसेल तर तक्रार करता येते. त्यासाठी गॅस कंपनीच्या टोल-फ्री क्रमांकावर कॉल करुन तक्रार नोंदवायची असते. Indaneचे ग्राहक 1800-2333-555 या क्रमांकावर, Bharat Gasचे ग्राहक 1800-22-4344 या क्रमांकावर आणि HP Gasचे ग्राहक 1800-2333-555 या क्रमांकावर त्यांची तक्रार नोंदवू शकतात. तक्रार नोंदवल्यानंतर ग्राहकांना एक रेफरन्स नंबर दिला जातो. त्याच्या मदतीने तक्रारीची स्थिती तुम्हाला तपासता येते. जर तरीही समस्या सुटली नाही तर ग्राहक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संबंधित गॅस कंपनीला टॅग करूनही आपली तक्रार मांडू शकतात. हा एक सोपा आणि प्रभावी पर्याय आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: स्ट्रीट क्राईमला लगाम; विठ्ठलवाडी पोलिसांचे मध्यरात्री कॉम्बिंग ऑपरेशन

Fact Check: हरभजन सिंगनं शेअर केलेला झोम्बी ड्रग्जचा VIDEO नेमका कुठला? व्हायरल व्हिडिओमागील सत्य भलतंच

Tea on empty stomach: सकाळी उठताच रिकाम्या पोटी चहा पिता? शरीराला होऊ शकतात ‘हे’ त्रास, आजच बदला तुमची ही सवय

Independence Day Movies: स्वातंत्र्यदिनाचा उत्साह वाढवा; देशभक्तीची भावना जागवणारे 'हे' ७ चित्रपट नक्की पाहा

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्त्याचा लाभ कुणाला मिळणार? कोणत्या शेतकऱ्यांना फटका बसू शकतो?

SCROLL FOR NEXT